मुंबई

वीज चोरीप्रकरणी वीज ग्राहकासह वापरदारावर गुन्हा दाखल

CD

वीजचोरीप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : अनधिकृतपणे वीजपुरवठा घेऊन वर्षभरापासून दोन हजार ७४१ युनिटची ९२ हजार ६० रुपयांची चोरी केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीजग्राहक शशिकांत भोईर आणि वीज वापरदार रवींद्र भोईर या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
राज्य विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता नितीन वाके यांनी कोपरी पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली आहे. १८ जुलै रोजी केलेल्या वीजचोरी तपासणी मोहिमेत भाईंदर पाडा गाव येथील विद्युत संचाची तपासणी करण्यात आली. या वेळी मीटरचे सील व बॉडीमध्ये छेडछाड केल्याचे आढळून आले. त्याचबरोबर मीटर वर प्लसची नोंद संथ गतीने होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार गेल्या १२ महिन्यांपासून दोन हजार ७४१ युनीटची ९२ हजार ६० रुपयांची वीजचोरी केली. ऑगस्ट २०१६ ते जुलै २०१८ या काळातदेखील पाच हजार २२४ युनिटची ७३ हजार ९१० रुपयांची वीजचोरी केली होती. या वीजचोरीसाठी त्यांना तडजोड रक्कम भरण्याची मुभा देण्यात आली होती, मात्र याच ग्राहकाने दुसऱ्यांदा हेतुपुरस्सर वीजचोरी करून महावितरण कंपनीचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी कोपरी पोलिस ठाण्यात त्या दोघांविरोधात भारतीय विद्युत कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोपरी पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Station Renamed: महत्त्वाची बातमी! रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्रातील 'या' रेल्वे स्थानकाचे नाव बदललं; कारण आलं समोर

कोणाला टबमध्ये बुडवून मारलं, तर कोणाला हौदात, सायको आंटीची चार मर्डरवाली खतरनाक काहानी!

Ambegaon News : घोडेगाव येथे दत्त जयंती निमित्त बैलगाडा शर्यत; तीन दिवसांत ५५० हून अधिक गाड्या पळणार!

Pune Crime: आधी गुंगीचं औषध देऊन पुरुषावर अत्याचार; आता दुसऱ्याला लग्नाची गळ, गुन्हा दाखल करण्याची धमकी

Dharashiv News : नॅशनल हेल्थ सिस्टीम्स रिसोर्स सेंटर मूल्यांकन पथक धाराशिव जिल्हा दौऱ्यावर; आरोग्य सेवांची गुणवत्ता उंचावण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम!

SCROLL FOR NEXT