मुंबई

हर सवाल का जवाब...बाबासाहेब.

CD

हर सवाल का जवाब... बाबासाहब!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संगीतमय आदरांजली
धारावी, ता. ४ (प्रतिनिधी) ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘हर सवाल का जवाब... बाबासाहब!’ हा संगीतमय आदरांजलीचा कार्यक्रम बुधवारी (ता. ४) दादर-माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये पार पडला. दोस्त कला मंचतर्फे दरवर्षी हा कार्यक्रम घेतला जातो.
ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर यांच्या शब्दात माईसाहेब आंबेडकर यांचे मनोगत, महात्मा फुले, शाहू महाराज यांचे व्यक्तिमत्त्व सादरीकरण, बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाचे चित्रीकरण करणाऱ्या दिवंगत नामदेव व्हटकर यांच्या कुटुंबीय मान्यवरांचा कृतज्ञता सन्मान हे यंदाच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. त्याचबरोबर विठ्ठल लाड आणि सहकाऱ्यांचे आदिवासी अस्मिता नृत्य, सुनंदा नेवसे पाटील, चित्रपट दिग्दर्शक महेश बनसोडे, अभिनेत्री दीपाली बडेकर, जयवंत हिरे, छायाताई कोरेगावकर, संदेश शालिनी संभाजी कर्डक, निनाद सिद्धये, बाळासाहेब उमप गजेंद्र मांजरेकर, मंजुषा गोवर्धन पेशवे, आदिती पोपट सातपुते, अनहद संध्या संदेश आदी कार्यकर्त्या कलावंतांनी सादर केलेल्या कविता, गाणी, नाट्यछटा, राकेश सुतारनिर्मित फुले- शाहू- आंबेडकर यांचे चित्रशिल्प अशा बहुविध कला प्रकाराद्वारे बाबासाहेबांना सांगीतिक आदरांजली अर्पण केली गेली.
या कार्यक्रमाची संकल्पना संयोजन रवी भिलाणे यांचे असून भानुदास धुरी, ज्योती बडेकर, अशोक जाधव, राजू शिरधनकर, संदेश गायकवाड, प्रशांत राणे आदींनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel War मुळे भारतात दारूचा दुष्काळ? उन्हाळ्यात थंड बिअरही मिळणार नाही? उत्पादनावर काय परिणाम होणार

IPL 2026: 'रोहित शर्मा डगआऊटमधून २० ओव्हर पाहू शकत नाही, त्याला...', माजी क्रिकेटरचा मुंबई इंडियन्सला स्पष्ट सल्ला

Gudhipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

Latest Marathi News Live Update : पुण्यात पिरंगुट घाटात कार दरीत कोसळली

Kolhapur Headmaster Tragedy : निलंबनाचे नैराश्य मुख्याध्यापकाने थेट आंब्याच्या झाडाला घेतला गळफास, कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT