मुंबई

ऐरोलीत भिमज्योत रॅलीद्वारे अभिवादन

CD

ऐरोलीत भीमज्योत रॅलीद्वारे अभिवादन
नवी मुंबई, ता. ७ (वार्ताहर) : विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ऐरोलीत भीमज्योत रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये ऐरोलीतील हजारो बौद्धबांधव सहभागी झाले होते.
जेतवन सामाजिक संस्था तसेच विविध बौद्ध विहारांचे पदाधिकारी डॉ. पी. एस. गौतम, आप्पासाहेब शिवशरण, प्रा. व्यंकट माने, बाळासाहेब डोळस यांच्या पुढाकाराने भीमज्योत रॅली काढण्यात आली होती. ऐरोली सेक्टर दोनमधील तक्षशिला बुद्ध विहार येथून ही रॅली ऐरोलीतील बुद्ध विहार, जयभीम स्तंभांना अभिवादन करून नवी मुंबई पालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाकडे मार्गस्थ झाली. या वेळी ऐरोली सेक्टर सहा येथील नालंदा विपश्यना केंद्र येथून सुरू झालेल्या दुसऱ्या रॅलीची सांगता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gudhipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

Latest Marathi News Live Update : पुण्यात पिरंगुट घाटात कार दरीत कोसळली

Kolhapur Headmaster Tragedy : निलंबनाचे नैराश्य मुख्याध्यापकाने थेट आंब्याच्या झाडाला घेतला गळफास, कोल्हापुरातील घटना

Pune News: घरगुती गॅसला स्वदेशी पर्याय; एनसीएल शास्त्रज्ञांचा देशांत पहिले यश, घरगुती एलपीजीसाठी ‘डीएमई’ गॅस तयार

स्टार प्रवाहचा झी मराठीला दणका! कमळी, स्वानंदीने स्थान गमावलं; टीआरपी आपटला, पहिल्या स्थानावर कोण?

SCROLL FOR NEXT