मुंबई

घाटलामध्ये दोन्ही शिवसेनेत चुरशीची लढत

CD

कानोसा - प्रभाग क्र. १५३
घाटलामध्ये दोन्ही शिवसेनेत चुरशीची लढत
जीवन तांबे : सकाळ वृत्तसेवा
चेंबूर विधानसभा मतदारसंघात मोडणारा घाटला प्रभाग १५३ मतदारसंघ सध्या इतर मागासवर्गीय महिलांकरिता राखीव झाला आहे. मराठीबहुल मतदार असलेल्या या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट, मनसे, भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचा प्रभाव आहे. या वेळी लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई विजयी झाले होते, तर विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार तुकाराम काते विजयी झाले आहेत. विधानसभा मतदार निवडणुकीत भाजप व शिंदे गटाची युती होती. त्यामुळे तुकाराम काते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. त्यामुळे पालिका निवडणुकीत यंदा शिवसेना शिंदे गट व शिवसेना ठाकरे गट यांच्यात घाटला प्रभागासाठी मोठी चुरस होणार आहे.

प्रभाग क्र. १५३ मध्ये अमरनगर, खारदेवनगर, घाटला गाव, मैत्रीपार्क, संभाजीनगर, मुक्तीनगर, आनंदनगरचा समावेश आहे. येथे सुमारे २६ हजार मतदार असून, कुणबी, धनगर, आगरी, बौद्ध समाजाचे प्राबल्य आहे. २०१७ मध्ये झालेल्या पालिका निवडणूकीवेळी हा प्रभाग खुल्या गटात होता, मात्र या निवडणुकीत इतर मागासवर्गीय महिलांसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाकडून कोण महिला उमेदवार रिंगणात असणार, त्यावर विजयाचे गणित ठरणार आहे. दरम्यान, वर्षानुवर्षे येथील रखडलेला झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, वाहतूक कोंडी, प्रास्ताविक डीपी मार्ग, मैदाने, शौचालये कमतरता, पालिका वसाहत पुनर्वसन प्रकल्प हे या प्रभागातील मुख्य प्रश्न आहेत.

पक्षातील अंतर्गत नाराजी, पक्षफुटीमुळे बदललेल्या राजकारणाचा पालिका निवडणुकीवर परिणाम होणार असून, त्याचा घाटला प्रभागातही प्रत्यय येणार आहे. आमदार काते यांनी येथे नगरसेवक म्हणून काम केले आहे, तसेच शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अनिल पाटणकरांचाही येथे दबदबा आहे. त्याचप्रमाणे भाजप, काँग्रेस, मनसेलाही मानणारा मतदार येथे आहे. त्यामुळे या प्रभागावर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच पक्षाकडून ताकद लावली जाणार आहे.

२०१७ मधील चित्र
- अनिल पाटणकर (शिवसेना ठाकरे गट) - १३६८३
- नागेश तवटे (भाजप)- ५८१६
- अविनाश पांचाळ (मनसे) - २५५३
- हेमंत पाटील (काँग्रेस) - २१२५

समस्या
- वर्षानुवर्षे रखडलेला पुनर्विकास
- वाहतूक कोंडी
- मैदानांचा अभाव
- शौचालयाची अपुरी व्यवस्था

प्रतिक्रिया
घाटला प्रभागातील अनेक एसआरए प्रकल्प रखडले आहेत, मात्र लोकप्रतिनिधी केवळ स्वत:चा फायदा पाहात असल्याने मतदार पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत.
- दीपाली शिरसाट, मतदार

प्रभागात जड वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे येथील वाहतूकीची समस्य गंभीर बनली आहे. तसेच वाढते प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करायला हव्यात. शौचालयाची समस्याही मार्गी लागणे अपेक्षित आहे.
- रवींद्र शिंदे, मतदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navale Bridge Accident: पुण्यात नवले पुलावर पुन्हा अपघात; एकाच दिवसात दोन घटना

REVIEW: 'बे दुणे तीन' एका गोड गोंधळाची कहाणी! अभय- नेहा कशी करतात तीन बाळांच्या येण्याची तयारी?

Indigo Refund News : 'इंडिगो'ने प्रवाशांना तब्बल ८२७ कोटी केले परत; आजही ५०० उड्डाणे झाली रद्द!

Viral Video : "भारतात सुट्टीसाठी भीक मागावी लागते, सिंगापूरमध्ये ‘लीव्ह’ फक्त सांगायची"! वर्क कल्चरची तफावत उघड करणारा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Update : आसारामचा जामीन रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

SCROLL FOR NEXT