मुंबई

उल्हासनगरात ‘ऑपरेशन ऑल आऊट’

CD

उल्हासनगरात ‘ऑपरेशन ऑल आऊट’
तीन तासांच्या संयुक्त मोहिमेत मद्यपी, वॉरंटेड आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
उल्हासनगर, ता. ८ (वार्ताहर) : उल्हासनगर शहरात शनिवारी रात्री झोन-४ चे पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन ऑल आऊट’ची धडाकेबाज अंमलबजावणी करण्यात आली. शहरातील गुन्हेगारीवर कडक लगाम घालण्याच्या उद्देशाने पोलिसांच्या विशेष पथकांनी विविध भागांत एकाच वेळी धडक कारवाई केली.

पोलिस उपायुक्त सचिन गोरे (झोन-४) यांच्या मार्गदर्शनाखाली ३९ अधिकारी आणि १९४ पोलिस कर्मचारी यांनी ही मोहीम राबविली. सहाय्यक पोलिस आयुक्तांना त्यांच्या नियंत्रण क्षेत्रातील गुन्हेगारांच्या अड्ड्यांवर थेट कोम्बिंग ऑपरेशनचे नेतृत्व करण्याची सूचना देण्यात आली होती.

रात्रीच्या वेळी अचानक केलेल्या या संयुक्त कारवाईत मद्यधुंद व्यक्तींपासून ते वॉरंटेड आरोपींपर्यंत सर्वांवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. शहरातील ७९ लॉजेस आणि बारची तपासणी करण्यात आली. तसेच ९८ हिस्ट्रीशीटर आणि तडीपार संशयितांची चौकशी करण्यात आली. ऑपरेशन ऑल आऊटचा भाग म्हणून शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी एकाच वेळी आठ नाकाबंद्या लावण्यात आल्या होत्या. या वेळी २०२ वाहनांची तपासणी करण्यात आली. तसेच २४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईत उल्हासनगर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने महत्त्वाची साथ दिली.

३४ व्यक्तींना बजावल्या नोटिसा
तपासणीत मद्य निषेधाच्या १७ प्रकरणांमध्ये १७ नोटिसा, एनडीपीएस सेवनाच्या पाच प्रकरणांत पाच नोटिसा, तंबाखूअंतर्गत नऊ प्रकरणे, तर तीन वॉरंट जारी करण्यात आले. तसेच ३४ व्यक्तींना नोटिसा बजावल्या आणि एमपीएअंतर्गत कलम १३१, १०२, ११७, ११२ नुसार १३ एनसी दाखल करण्यात आले.

Navale Bridge Accident: पुण्यात नवले पुलावर पुन्हा अपघात; एकाच दिवसात दोन घटना

REVIEW: 'बे दुणे तीन' एका गोड गोंधळाची कहाणी! अभय- नेहा कशी करतात तीन बाळांच्या येण्याची तयारी?

Viral Video : "भारतात सुट्टीसाठी भीक मागावी लागते, सिंगापूरमध्ये ‘लीव्ह’ फक्त सांगायची"! वर्क कल्चरची तफावत उघड करणारा व्हिडिओ व्हायरल

31 December Deadlines : ३१ डिसेंबर पर्यंतच करून घ्या ‘ही’ महत्त्वाची कामे; परतपरत नाही मिळणार संधी!

Latest Marathi News Update : मुंढवा सरकारी जमीन विक्री प्रकरणात रवींद्र तारू यांना आठ दिवसांची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT