मुंबई

दुबार मतदारांची डोकेदुखी

CD

दुबार मतदारांची डोकेदुखी
निवडणूक आयोगाची पालिका प्रशासनाला सूचना
पनवेल, ता. ८ (बातमीदार)ः पनवेल महापालिका क्षेत्रात २०,१९२ दुबार मतदारांची नावे आढळल्याने निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. याच अनुषंगाने तत्काळ कारवाईच्या सूचना दिल्या असून, कमी कालावधीत काम पूर्ण करण्याचे आव्हान पालिका प्रशासनासमोर आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील ऐरोली, बेलापूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांची नावे असल्याचे समोर आले आहे. प्रभाग क्रमांक १४ ते २० या पूर्वाश्रमीच्या नगरपालिका हद्दीत ६,९५३ दुबार नावे आढळली आहेत. या प्रकरणाबाबत काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष निर्मला म्हात्रेंनी यादीसह अधिकृत तक्रार मनपा प्रशासनाकडे दाखल केली आहे. खांदा कॉलनी, नवीन पनवेल, तक्का, पनवेल शहर, मोठा-धाकटा खांदा गाव, भिंगारी-काळुंद्रे परिसरांत दुबार मतदार सर्वाधिक आहेत. महापालिकेच्या निवडणुका जवळ येत असताना दुबार नावे आढळल्याने मतदार यादीच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे आगामी निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी पालिकेला प्रशासन कामाला लागले आहे.
------------------------
यादी पडताळणी सुरू
- खारघरमधील प्रभाग क्रमांक ५ आणि ६ मध्ये ३, ८०० दुबार मतदार नोंदले गेले आहेत. महापालिका प्रशासनाचे पथक स्कुटीनीद्वारे प्रत्यक्ष पडताळणी करीत असून, नावांची शुद्धता सुनिश्चित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
- कळंबोली परिसरातील प्रभाग ७ ते १० मध्ये ३,१३० दुबार नावे आहेत. कामोठे वसाहतीतील प्रभाग ११, १२ आणि १३ मध्ये ३,११० मतदारांची नावे दोनदा नोंदली गेल्याचे मनपा प्रशासनाच्या यादीनुसार स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navale Bridge Accident: पुण्यात नवले पुलावर पुन्हा अपघात; एकाच दिवसात दोन घटना

REVIEW: 'बे दुणे तीन' एका गोड गोंधळाची कहाणी! अभय- नेहा कशी करतात तीन बाळांच्या येण्याची तयारी?

Indigo Refund News : 'इंडिगो'ने प्रवाशांना तब्बल ८२७ कोटी केले परत; आजही ५०० उड्डाणे झाली रद्द!

Viral Video : "भारतात सुट्टीसाठी भीक मागावी लागते, सिंगापूरमध्ये ‘लीव्ह’ फक्त सांगायची"! वर्क कल्चरची तफावत उघड करणारा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Update : आसारामचा जामीन रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

SCROLL FOR NEXT