पनवेल महापालिकेचा रेबीज निर्मूलनासाठी पुढाकार
मोफत लसीकरण शिबिराला प्रतिसाद
पनवेल, ता. ८ (बातमीदार) : पनवेल महानगरपालिका पशुवैद्यकीय विभाग व मिनिस्ट्री ऑफ पेट्स यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन पनवेल येथील जागृती सभागृहात मोफत लसीकरण व आरोग्यसेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
शिबिरात २२५ पाळीव श्वान व मांजरींचे रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले. आरोग्य तपासणीसह तज्ज्ञ मार्गदर्शनही देण्यात आले. “शून्य रेबीज” हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पनवेल महापालिका राष्ट्रीय ए–२०३० कार्यक्रमांतर्गत आक्रमक मोहीम राबवत आहे. रेबीज हा पूर्णपणे प्रतिबंधात्मक आजार असल्याने पाळीव तसेच भटक्या प्राण्यांचे वेळेवर लसीकरण अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान गीते, डॉ. मधुलिका लाड, राजश्री वावेकर, वृषाली वाघमारे व डॉ. राजू पाटोदकर आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय ही सेवा शहरातील प्राणीप्रेमींसाठी मोठा दिलासा ठरत असून, यामुळे आरोग्यसेवा अधिक सुलभ झाली आहे. उपायुक्त प्रसेनजित कारलेकर व मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभरात महापालिकेने प्रभावी कामगिरी केली आहे.
---
चौकट : भटक्या प्राण्यांसाठीही मोहीम
१५,६८९ भटकी श्वाने – रेबीज लसीकरण
१,९८० भटकी श्वाने व ३४५ मांजरी – जन्म नियंत्रण उपचार
१,००० नागरिकांनी फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याचा लाभ
फिरत्या दवाखान्यातून ६०० श्वान व मांजरींचे लसीकरण
----
चौकट : शिबिरातील सुविधा
- रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण
- पाळीव प्राण्यांची मोफत आरोग्य तपासणी
- जंतनाशक औषधोपचार
- तज्ज्ञांकडून आरोग्य व्यवस्थापन मार्गदर्शन
---
कोट
“पनवेल महापालिका प्राण्यांच्या आरोग्याबाबत संवेदनशीलतेने काम करत आहे. मोफत लसीकरण, आरोग्य तपासणी आणि फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय या सेवांमुळे नागरिकांची सुरक्षितता वाढत आहे. पनवेलला आधुनिक व आरोग्यदायी शहर बनवण्यासाठी महापालिका सातत्याने पावले उचलत आहे.”
परेश ठाकूर, माजी सभागृह नेते, पनवेल महानगरपालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.