मुंबई

महिलांच्या सुरक्षेसाठी ‘लाईफ सायकल अप्रोच’ची गरज - आयुक्त अभिनव गोयल

CD

महिलांच्या सुरक्षेसाठी ‘लाइफ सायकल अप्रोच’ची गरज ः आयुक्त अभिनव गोयल
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ८ ः मुलीच्या जन्मापासून ते तिच्या आयुष्याच्या अखेरीपर्यंत आरोग्य, शिक्षण, पोषण, विवाह, करिअर, कार्यस्थळ आणि वृद्धत्व अशा प्रत्येक टप्प्यावर तिच्या सुरक्षेला आणि सक्षमीकरणाला प्राधान्य दिले गेले पाहिजे. समाजात लाइफ सायकल अप्रोचची मानसिकता निर्माण होणे काळाची गरज आहे, असा संदेश आयुक्त अभिनव गोयल यांनी दिला.
इनरव्हील क्लब झोन सहातर्फे महिलांच्या सुरक्षेबाबत जागृतीसाठी कल्याण येथील सिटी पार्कमधील ॲम्फी थिएटरमध्ये आयोजित युनाइट ॲण्ड ऑरेंज या कार्यक्रमात ते बोलत होते. महिलांची मोठी उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली.
गोयल म्हणाले, महिलांच्या स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. पालिका आणि इनरव्हील क्लबच्या संयुक्त प्रयत्नांतून हा उपक्रम अधिक गतीने राबवू. शासनस्तरावर सुरू असलेला लाइफ सायकल अप्रोच सामाजिक पातळीवरही प्रभावीपणे राबवण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या वेळी इनरव्हील क्लबच्या जिल्हा चेअरमन लक्ष्मी सिंग यांनी महिलांकडूनच महिलांवर होणाऱ्या मानसिक अत्याचाराकडेही समाजाने गांभीर्याने पाहावे, असे प्रतिपादन केले, तर खडकपाडा पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक रुपाली दांगट यांनी अत्याचाराचा पहिल्याच वेळी कणखर प्रतिकार केला, तर कोणीही पुन्हा जवळ येण्याची हिंमत करणार नाही, असे सांगत त्यांनी महिलांविरोधातील वाढत्या गुन्ह्यांबाबतही मार्गदर्शन केले.
अध्यक्षा डॉ. तृप्ती बोबडे यांनी समाजातील महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमादरम्यान महिला अत्याचाराविरोधातील जनजागृतीपर पथनाट्य सादर केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. संध्या भट, काजोल खतवानी आणि विविध शाखांच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Dowry Harassment Ruling : सासरच्यांनी सुनेला जुळवून घेण्यास सांगितल्यास गुन्हा दाखल होणार? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

Latest Marathi News Live Update : अर्जुन खोतकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट

Blackmail case: महिलेसोबतच्या व्हिडीओवरून ब्लॅकमेल, बँक कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल; ६ जणांवर गुन्हा, चौघांना अटक

Farmer Protest: कांद्याला भाव नाही, शेतकरी आक्रमक! पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घेतलं ताब्यात, चांदवडमध्ये रस्त्यावर रणकंदन

Kolhapur VIP Service: कोल्हापूरसह परराज्यातील तरुणींकडून व्हिआयपी सर्व्हिस, म्हैसाळमधील आलिशान बारवर छापा; नशेत धुंद तरुणांना घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT