मुंबई

टिटवाळ्यात मोफत तीन दिवसीय स्विमिंग प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

तीनदिवसीय स्विमिंग प्रशिक्षणाला प्रतिसाद
टिटवाळा, ता. ८ (वार्ताहर) ः टिटवाळ्यात विनायक मार्शल आर्ट आणि फिटनेस झोनतर्फे तीनदिवसीय मोफत स्विमिंग प्रशिक्षण शिबिर पार पडले. या शिबिराला विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. रिव्हर मून रिसॉर्ट येथे ५ ते ७ डिसेंबरदरम्यान भरलेल्या या कॅम्पमध्ये सुमारे ६० हून अधिक युवक-युवती सहभागी झाले.
पहिल्या दिवशी पाण्यात उतरण्यापूर्वी घ्यावयाची काळजी, हायजिन, स्ट्रेचिंग व प्राथमिक स्विमिंग व्यायामांची सविस्तर माहिती देण्यात आली. पाण्यात श्वास घेणे-सोडणे, श्वास नियंत्रण, शरीराचा समतोल आणि पाण्यासोबत मन शांत ठेवण्याचे कौशल्य सहभागींना प्रत्यक्ष शिकवण्यात आले. दुसऱ्या दिवशी किक-पूश, समोरील दिशेने फ्लोट होणे आणि फ्रीस्टाइल स्विमिंगची सुरुवातीची तंत्रे शिकवली गेली. १० मीटरचे अंतर योग्य पद्धतीने कसे पार करायचे याचे प्रात्यक्षिक करून घेतले.
या प्रशिक्षणासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विनायक कोळी उपस्थित होते, तर हरीष वायदंडे, समाधान कोंडावळे, संतोष जाधव, गौरी तिटमे, मोहित कोळी, वैशाली व आर्या यांनी मोलाचे सहकार्य दिले. टिटवाळ्यात प्रथमच भरलेल्या या कॅम्पसाठी संतोष तरे यांनी रिव्हर मुन रिसॉर्टचा स्विमिंग पूल पूर्णपणे उपलब्ध करून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विषारी दारुकांडातील मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून ५ लाखांची मदत, महापालिकेत नोकरीबाबत सकारात्मक निर्णय घेणार

Rajat Patidar: Dhoni रोहितची बरोबरी? फायनलपूर्वी RCB कर्णधार रजत पाटीदारने मनातील गोष्ट सांगितली म्हणाला मी कधी विचार..

Gemini Omni ने बदलली व्हिडिओ एडिटिंगची दुनिया; AI वापरुन मिनिटात बनवा हवा तसा व्हिडिओ, कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : चंद्रपूरात रानटी हत्तींचा वावर वाढला; वन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

US-Iran Deal : अमेरिका-इराण अंतिम करार पुन्हा खोळंबला, डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'या' २ नव्या मागण्यांनी वाढवलं टेन्शन

SCROLL FOR NEXT