गहाळ मोबाईल शोधून मूळ मालकांना परत
कर्जत पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी; ४२ मोबाईल केले हस्तगत
कर्जत, ता. १० (बातमीदार) ः कर्जत पोलिसांनी उल्लेखनीय कारवाई करून गहाळ मोबाईल फोन शोधून ते त्यांच्या मूळ मालकांना सुपूर्द केले आहेत. अनेक वर्षांपूर्वी हरविलेल्या मोबाईलचा शोध घेऊन ते पुन्हा दिल्याने नागरिकांनी पोलिस तपासाचे कौतुक केले आहे.
१० डिसेंबर रोजी कर्जत पोलिस ठाण्यात विशेष उपक्रम राबविण्यात आला. २०२१, २०२३, २०२४ आणि २०२५ या कालावधीत हरविलेले मोबाईल क्लियर पोर्टलच्या मदतीने ट्रॅक करून शोधण्यात आले. तपासादरम्यान महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, छत्तीसगड आणि बिहार या राज्यांत वापरात असलेले मोबाईल लोकेट करण्यात पोलिसांना यश आले. स्वतः उपस्थित राहू शकणाऱ्या नागरिकांना थेट पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले, तर काही मोबाईल कुरिअरद्वारे संबंधितांकडे पोहोचवण्यात आले. अशाप्रकारे एकूण ४२ मोबाईल हस्तगत करण्यात आले. या विशेष उपक्रमाचे मार्गदर्शन उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल गायकवाड यांनी केले, तर संपूर्ण कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वरोटे, सैय्यद आणि पोलिस उपनिरीक्षक वरक यांच्या उपस्थितीत तक्रारदारांना मोबाईल परत देण्यात आले. गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस हवालदार समीर भोईर, स्वप्नील येरूणकर, केशव नागरगोजे आणि विठ्ठल गावस यांनी या मोहिमेत विशेष मेहनत घेतली. एकूण ४२ मोबाईलपैकी २८ मोबाईल प्रत्यक्ष तक्रारदारांच्या ताब्यात देण्यात आले असून, उर्वरित १४ मोबाईल संबंधित तक्रारदार हजर होताच सुपूर्द केले जाणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.