मुंबई

रुंदीकरणातील बाधितांना नुकसानभरपाई द्या

CD

भिवंडी, ता. १० (वार्ताहर) : शहरातील वाहनतळ समस्या आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी; तसेच ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो प्रकल्पाला पूरक उपाययोजना म्हणून पालिकेने विकास आराखड्यानुसार ३६ मीटर रस्ता रुंदीकरण करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या प्रक्रियेत बाधित मालमत्ताधारकांना कोणतीही नुकसानभरपाई न दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या संदर्भात भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनातील विधानसभा सभागृहात नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.
रस्ता रुंदीकरणासाठी अनेक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहकार्य केले; परंतु पालिकेने मोबदल्याबाबत स्पष्ट धोरण न आखता कारवाई केली. यासाठी शेख यांनी सभागृहात मांडले की, निवासी बाधितांना टाटा आमंत्रा येथे तात्पुरती निवास व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. नुकसानभरपाई देताना जमीन मालक आणि त्यावरील बांधकाम/मालमत्ताधारक दोघांनाही समान लाभ मिळावा. तसेच सरकारी जमिनीवर बांधकाम असलेल्या मालमत्ताधारकांनाही मोबदल्याचा लाभ द्यावा. शेख पुढे म्हणाले, मुंबईतील एमएमआरडीएकडून ज्या पद्धतीने मोबदला दिला जातो, त्याच धर्तीवर भिवंडीतील बाधितांना न्याय्य नुकसानभरपाई देण्यात यावी. या संदर्भात आठवडाभरात बैठक आयोजित करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. रस्ता रुंदीकरणामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या प्रश्नांवर सरकार व पालिकेने तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: प्रेयसीचा मॅसेज आला अन् भेटायला गेला …; काही तासांतच आईला फोन, प्रेमसंबंधातून तरूणाला संपवलं, कोथरूडमध्ये काय घडलं?

LPG गॅस कमतरतेच्या अफवा वाढल्या अन् प्ले स्टोअरवर झाला धूमाकुळ; नंबर 1 डाउनलोडवर पोहोचले 'हे' ॲप, जाणून घ्या का वाढली डिमांड

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

अरे व्वा! अनुष्का शेट्टी लवकरच करणार लग्न? वयाच्या 44 व्या वर्षी व्यावसायिकासोबत बांधणार लग्नगाठ?

Rasgulla Choking Death : लग्नात जेवताना घशात रसगुल्ला अडकल्याने मृत्यू, विचित्र घटनेने सगळेच हादरले; डॉक्टरांनी सांगितले नेमके कारण

SCROLL FOR NEXT