मुंबई

कोंडिवली समुद्रकिनाऱ्यावर मंडप उभारत पर्यटकांचे लग्न

CD

कोंडिवली समुद्रकिनाऱ्यावर मंडप उभारत पर्यटकांचे लग्न
स्थानिक प्रशासनाला विवाहाची कोणतीही पूर्वकल्पना नसल्याने खळबळ
श्रीवर्धन, ता. १५ (वार्ताहर) ः तालुक्यातील कोंडिवली समुद्रकिनाऱ्यावर कोणतीही अधिकृत परवानगी न घेता पर्यटकांनी थेट वाळूत मंडप उभारून विवाह सोहळा पार पाडल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. १४) सायंकाळी घडली. पुण्याहून आलेल्या पर्यटकांनी लग्नासाठी आवश्यक असलेले मंडपाचे सर्व साहित्य सोबत आणून कोंडिवली येथील सिल्वर सँड हॉटेलसमोरील समुद्रकिनाऱ्यावर भव्य मंडप उभारून आपल्या निकटवर्तीयाचे लग्न लावले.
वधू-वर व त्यांच्या नातेवाइकांच्या राहण्याची व्यवस्था समोरच असलेल्या सिल्वर सँड हॉटेलमध्ये करण्यात आली होती, मात्र या प्रकारच्या समुद्रकिनाऱ्यावर होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी स्थानिक प्रशासन, महसूल विभाग किंवा पोलिस यांची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, असा विवाह सोहळा सुरू असताना श्रीवर्धन तालुक्याच्या प्रशासनाला याची साधी कल्पनाही नव्हती, ही बाब अधिकच चिंताजनक मानली जात आहे. परंपरेनुसार पूर्वी विवाह घराच्या अंगणात पार पडत असत, तर सध्याच्या काळात मंगल कार्यालये किंवा लॉनमध्ये विवाह होतात, मात्र स्थानिक प्रशासनाची परवानगी न घेता थेट समुद्रकिनाऱ्याच्या वाळूत मंडप उभारून लग्न लावण्याचा हा प्रकार महाराष्ट्रातील दुर्मिळ, कदाचित पहिलाच प्रकार असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनारे अत्यंत संवेदनशील मानले जातात. १९९३ रोजी मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटासाठी वापरण्यात आलेले आरडीएक्स हे स्फोटक याच परिसरात, सदर लग्नमंडपाच्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर उतरविण्यात आले होते, ही पार्श्वभूमी लक्षात घेता सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर ठरतो.
....................
सखोल चौकशीची मागणी
या लग्नसमारंभासाठी समुद्रकिनाऱ्याची जागा कोणी उपलब्ध करून दिली, परवानगी कोणी दिली, तसेच हॉटेल व्यवस्थापनाची भूमिका काय होती, याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व पोलिस निरीक्षक यांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधित व्यक्तींसह लग्नासाठी प्रोत्साहन देणाऱ्या हॉटेल मालकावरही कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICICI Credit Card Rule Change: ICICI क्रेडिट कार्ड युजर्सना धक्का! १ फेब्रुवारी पासून नियमांमध्ये बदल, एक लोकप्रिय सुविधाही बंद

Kolhapur Drugs : सोशल मीडियातून नशेचा सापळा; GPS च्या मदतीने कोल्हापूर बनले ड्रग्ज तस्करीचे नवे केंद्र

Mumbai Crime : मुंबईत खळबळ ! परदेशी महिलेकडील ६६ लाखांची रक्कम लुटली, आरोपी नकली पोलिस बनून आले अन्...

Vastu Tips: वास्तुशास्त्राचा इशारा! ‘या’ गोष्टी घडल्यास लवकरच येऊ शकते आनंदाची बातमी

Chhatrapati Sambhajinagar Crime : घटस्फोटितेला लग्नाचे आमिष दाखवून ठेवले शारीरिक संबंध; गर्भवती राहिल्यावर गोळ्याही दिल्या

SCROLL FOR NEXT