मुंबई

तडीपार गुन्हेगार कोयत्यासह जेरबंद

CD

उल्हासनगर, ता. १६ (वार्ताहर) : उल्हासनगरच्या हिललाईन परिसरात पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुन्हा एकदा मोठा अनर्थ टळला आहे. नियमित गस्तीदरम्यान तडीपार सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. त्याच्याकडून धारदार लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
उल्हासनगर येथील हिललाईन पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने नियमित पेट्रोलिंगदरम्यान प्रभावी कारवाई करत तडीपार गुन्हेगार आकाश भिडे याला ताब्यात घेतले आहे. गस्त घालताना भिडे फिरताना दिसून आला. पोलिसांना पाहताच तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला; मात्र पोलिस कर्मचाऱ्यांनी तत्काळ पाठलाग करून त्याला पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे कोयता आढळून आला. त्यामुळे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात आली आहे. ही संपूर्ण कारवाई हिललाईन पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. पथकात पोलिस उपायुक्त सचिन गोरे, वरिष्ठ निरीक्षक संदीप शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश बेंडकुळे, पोलिस उपनिरीक्षक संग्राम मालकर, बाळासाहेब रावखंडे यांच्यासह इतर कर्मचारी यांचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

संत एकनाथ महाराज : अभ्यासे सार्थक करी काळु

सोलापुरात वाढल्या चोरी, पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरी! रात्री ११ ते मध्यरात्री ३ वाजेपर्यंत १०० पोलिस अधिकारी-अंमलदारांचे कोम्बिंग ऑपरेशन, वाचा...

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! आता विद्यापीठातही ‘अभियांत्रिकी’चे शिक्षण; ‘या’ ८ अभ्यासक्रमांना मंजुरी, २८० प्रवेश क्षमता, वाचा...

आजचे पंचांग २७ जून २०२६! शनिप्रदोष, शिवराज्याभिषेक दिन, शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

SCROLL FOR NEXT