मुंबई

तलाठींच्या संपामुळे कामकाज ठप्प

CD

तलाठ्यांचा ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार
गरजेच्या उपकरणांसाठी आंदोलनाचे हत्यार

कासा, ता. (१६ बातमीदार) : राज्यातील ग्राम महसूल यंत्रणेत कणा मानल्या जाणाऱ्या तलाठी व मंडळाधिकाऱ्यांनी ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकल्याने शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन महसूल सेवांवर मोठा परिणाम होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. राज्यभरातील तलाठी व मंडळाधिकाऱ्यांनी सोमवारपासून (ता. १५) कामकाजावर बहिष्काराचे हत्यार उपसले आहे.
तलाठी कार्यालयांमध्ये वापरात असलेले लॅपटॉप, प्रिंटर व स्कॅनर ही संगणकीय साधने अनेक वर्षांपासून जीर्ण व निकामी अवस्थेत असून, त्यामुळे ऑनलाइन कामकाज करताना मोठ्या अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर नवीन व उच्चक्षमतेची संगणकीय साधने उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या वतीने वारंवार शासनाकडे करण्यात आली, मात्र सातत्याने पाठपुरावा करूनही शासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नसल्याने अखेर बहिष्काराचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने दिला आहे.
महसूलविषयक कामांसाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनी व शेतकऱ्यांनी परिस्थिती लक्षात घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन ग्राम डहाणू महसूल अधिकारी (तलाठी) संघाचे आत्माराम घरत यांनी केले आहे.
बहिष्काराचा थेट परिणाम ७/१२ व ८-अ उतारे वितरण, ई-पीक पाहणी नोंदणी, ई-फेरफार प्रक्रिया, ऑनलाइन वाहन तपासणी तसेच शेतकरी ओळखपत्र मंजुरीसह विविध महत्त्वाच्या ऑनलाइन महसूल सेवांवर होणार आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.


वसईत नागरिकांची कामे खोळंबली

विरार ता. १६ (बातमीदार) : वसईतील तलाठी व मंडळ अधिकारी सोमवारपासून संपावर गेल्यामुळे तलाठी कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची कामे खोळंबली आहेत. तलाठी कार्यालयात लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर नाहीत. मागणी करूनही या गरजेच्या उपकरणांची पूर्तता प्रशासन करीत नसल्यामुळे महाराष्ट्र राज्य तलाठी संघ, तालुका वसई या संघटनेमार्फत आंदोलन छेडण्यात आले.
वसईतील ५२ तलाठी सजामधील ३२ तलाठी व ९ मंडळ अधिकारी यांनी तलाठी कार्यालयांना आवश्यक असणारी डीएससी नायब तहसीलदार शशिकांत नाचण यांच्याकडे जमा केली. या वेळी लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे. मागील काही काळापासून या उपकरणांची पूर्तता करण्यात येत नसल्यामुळे ऑनलाइन कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. विविध सजामधील तलाठी स्वतःचे वैयक्तिक साधन सामग्री वापरून येथील कामकाज करीत आहेत. आधीच तलाठी कार्यालयांमधून नागरिकांची कामे विहित मुदतीत होत नसल्यामुळे तलाठ्यांविरोधात अनेक तक्रारी तहसील कार्यालयामध्ये दाखल होत असतात. त्यातच या संपामुळे महसूल संदर्भातली कामे ठप्प झाल्यामुळे नागरिकांच्या त्रासात आणखी भर पडलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NED, T20 WC: टीम इंडियाचा विजयी चौकार! नेदरलँड्सने दिली कडवी झुंज; आता Super 8s मध्ये भारतासमोर ३ तगडे संघ

मोठी बातमी! उजनीतून सोडलेले पाणी कर्नाटकने आडविले, दक्षिण सोलापूरमधील शेती, गावे तहानली; तरीपण जलसंपदामंत्री विखे पाटील कॉल उचलेनात, वाचा...

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपींनी दिला कबुलीजबाब!

Dumper Accident : भरधाव डंपरची आठ वाहनांना धडक; कात्रज ते वडगावदरम्यान महामार्गावर थरार

Mangalwedha News : 1650 अल्पभूधारक शेतकऱ्यांना मनरेगा योजनेचा लाभ देण्याची सुनंदा आवताडे यांची भरत गोगावले यांच्याकडे मागणी

SCROLL FOR NEXT