मुंबई

या मुलांचे पालक कोण?

CD

या मुलांचे पालक कोण?

मुंबई, ता. १६ : मनिषा संजय काते (वय १७ वर्षे) ही मुलगी श्री मानव सेवा संघ, सायन या संस्थेत बालकल्याण समिती, मुंबई शहर यांच्या आदेशाने ‘साल्वेशन आर्मी’ या संस्थेतून बदली आदेशावर १७ जून २०२३ मध्ये दाखल झाली आहे. मुलीची आई अनिता संजय काते या कळवा शांती नगर झोपडप‌ट्टी येथे तीन मुलांसह भाड्याच्या घरात राहत होत्या. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे मुलीला संस्थेत दाखल केले. त्यानंतर या मुलीच्या आईचा मृत्यू झाला. तसेच वडील बेपत्ता आहेत.
करिना महेश परदेशी (वय २१ वर्षे) ही मुलगी बालकल्याण समिती, मुंबई शहर यांच्या आदेशाने ‘बालिकाश्रम’ दादर मुंबई या संस्थेतून श्री मानव सेवा संघ, सायन या संस्थेत बदली आदेशावर १६ जुलै २०१७ रोजी दाखल झाली आहे. या मुलीची आई (सोनी परदेशी) व वडील (महेश परदेशी) बऱ्याच वर्षांपासून बेपत्ता असल्याने करिनाला आजी (कल्लुबाई परदेशी) यांनी संस्थेत दाखल केले होते. तसेच करिना व तिची मोठी बहीण करिष्मा संस्थेत दाखल झाल्यानंतरदेखील काका-काकू त्यांना भेटण्यास आले नाहीत. कालांतराने मुलीची आजी (कल्लुबाई परदेशी) यांचे निधन झाले.
या दोन्ही मुलींच्या पालकांचा अद्यापपर्यंत शोध लागलेला नाही. पालकांनी या मुलींसाठी श्री मानव सेवा संघ २५५-२५७, सायन मेन रोड, सायन (प.), मुंबई - ४०० २२ (दूरध्वनी क्र. ०२२ ६२६३६४६५/५१) येथे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar AI Video: अजित पवारांच्या आवाजात खोटा एआय व्हिडीओ केल्यास कडक कारवाई; राष्ट्रवादी काँग्रेसचं पत्र

Mohammad Shami : मोहम्मद शमीच्या अडचणीत वाढ!, आता पत्नीने ठोठवला सुप्रीम कोर्टाचा दरवाजा

IND vs NED, T20 WC: इशान किशनची 'दुर्दैवी' विकेट! भारताच्या दोन्ही ओपनरचा 'दांडा' उडवणारा Aryan Dutt कोण?

Latest Marathi News Live Update : अजित पवारांच्या आवाजात खोटे ‘व्हिडीओ’ बंद करावेत – तटकरे

IND vs NED, T20 WC: अभिषेक शर्माचा 'गोंधळ'! भलत्याच खेळाडूची जर्सी घालून फलंदाजीला आला अन् आजही भोपळ्यावर माघारी परतला

SCROLL FOR NEXT