मुंबई

अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना जामीन नाहीच

CD

अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना जामीन नाहीच
पुणे पोर्श अपघातप्रकरणी याचिका न्यायालयाने फेटाळल्या 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १६ : पुणे पोर्श अपघात प्रकरणातील सात आरोपींना जामीन देण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी (ता. १६) नकार दिला. यामध्ये मुख्य अल्पवयीन आरोपीच्या वडिलांच्या जामीन अर्जाचाही समावेश आहे. या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता.

न्या. श्याम चांडक यांच्या एकलपीठाने आरोपींच्या याचिकांवर सविस्तर युक्तिवाद ऐकल्यानंतर याचिका फेटाळून लावली. न्यायालयाच्या आदेशाची सविस्तर प्रत अद्याप उपलब्ध झालेली नाही. न्यायालयाने विशाल अग्रवाल, आशीष मित्तल, आदित्य सूद, अरुणकुमार सिंह, अश्पाक मकंदर, डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हलनोर यांना जामीन नाकारला.  सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील शिशिर हिरे आणि सहकारी सरकारी वकील संजय कोंकणे यांनी युक्तिवाद करताना, आरोपींनी या प्रकरणातील अत्यंत महत्त्वाचा पुरावा म्हणजेच अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलले. शिवाय, या प्रकरणातील साक्षीदार हे वैद्यकीय विद्यार्थी आणि पदपथावरील गरीब व्यक्ती आहेत. आरोपींची जामिनावर सुटका झाल्यास साक्षीदारांना धमकावण्याची शक्यता असल्याचेही आरोपींच्या याचिकेला विरोध करताना सरकारकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

Ketan Agarwal Killed Case : गुगलवर शोधले खून करण्याचे पर्याय;गडावरून ढकलण्याचा केला होता सराव

Latest Marathi News Live Update : मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या नेटवर्कवर १०८ वातानुकूलित लोकल गाड्या चालवत

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Hadapsar Crime : काळेपडळ पोलिसांकडून सुमारे दहा लाख रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT