नवी मुंबई प्रॉपर्टी एक्स्पो–२०२५’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
गृहखरेदीदारांचा मोठा सहभाग; चौकशीसह व्यवहारांना वेग
वाशी, ता. १७ (बातमीदार) : क्रेडाई–बीएएनएमतर्फे आयोजित करण्यात आलेल्या २४ व्या ‘नवी मुंबई प्रॉपर्टी एक्स्पो–२०२५’ ला चार दिवसांत गृहखरेदीदार, गुंतवणूकदार आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये १२ ते १५ डिसेंबर दरम्यान पार पडलेल्या या प्रदर्शनाला दररोज मोठी गर्दी पाहायला मिळाली. घर खरेदीसाठी इच्छुक नागरिकांनी प्रत्यक्ष भेट देत विविध प्रकल्पांची माहिती घेतली, तर अनेकांनी प्राथमिक व्यवहारही निश्चित केल्याचे चित्र दिसून आले.
या प्रदर्शनात नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरातील निवासी, व्यावसायिक, टाऊनशिप तसेच लक्झरी प्रकल्पांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आली होती. २० लाख रुपयांपासून पुढे उपलब्ध असलेल्या घरांच्या पर्यायांना विशेष पसंती मिळाली. मध्यमवर्गीय तसेच प्रथमच घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांची उपस्थिती लक्षणीय होती. तब्बल १०० हून अधिक विकसकांचे ५०० पेक्षा अधिक गृहप्रकल्प या प्रदर्शनात सादर करण्यात आले होते. विमानतळ संकल्पनेवर आधारित आकर्षक स्टॉल्स हे प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरले. ग्राहकांना प्रकल्पांची माहिती सहज समजावी यासाठी मॉडेल्स, डिजिटल सादरीकरण आणि तज्ज्ञ मार्गदर्शनाची सोय करण्यात आली होती. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू, नवी मुंबई मेट्रो, कोस्टल रोड, तळोज–पनवेल रोडवे आणि विरार–अलिबाग मल्टी-मॉडल कॉरिडॉर यांसारख्या महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांमुळे भविष्यातील गुंतवणुकीबाबत गृहखरेदीदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. शहरातील वाढत्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी १४ डिसेंबर रोजी गृहनिर्माण संस्थांसाठी विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या सत्रात पुनर्विकासाच्या संधी, प्रक्रिया, कायदेशीर बाबी आणि लाभ याविषयी तज्ज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या चर्चासत्रालाही गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
......................
गुंतवणूकदार आकर्षक
प्रदर्शनाच्या यशाबाबत बोलताना क्रेडाई–बीएएनएमचे अध्यक्ष रसिक चौहान यांनी सांगितले की, नवी मुंबई–पनवेल परिसरातील वेगाने विकसित होणारी दळणवळण व्यवस्था, नैना प्रकल्प आणि खारघरमधील भविष्यातील हब यामुळे हा परिसर गृहखरेदीदार आणि गुंतवणूकदारांसाठी अत्यंत आकर्षक ठरत आहे. प्रदर्शनाला मिळालेला प्रतिसाद हा या विकासाचीच पावती असल्याचे त्यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.