मुंबई

कोंडीवरून शिवसेना मनसे आयआयटी प्रशासनावर धडकले

CD

कोंडीवरून शिवसेना-मनसे आयआयटी प्रशासनावर धडक; ‘मूड इंडिगो’मुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयी
घाटकोपर, ता. १८ (बातमीदार) ः आयआयटी मुंबई येथे सुरू असलेल्या ‘मूड इंडिगो’ या सांस्कृतिक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परिसरात निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीबाबत शिवसेना-मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आयआयटी प्रशासनाशी चर्चा केली. या वेळी वाढलेली गर्दी, अपुरे वाहतूक व्यवस्थापन आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी काही भागांत वाहतूक संथ झाल्याने भांडुप, पवई, साकीनाका तसेच गोरेगाव परिसरातील नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. कार्यालयीन वेळेत वाहनांच्या रांगा लागल्याने दैनंदिन कामकाजावर परिणाम झाल्याचेही सांगण्यात आले.
दरम्यान, परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन आयआयटी प्रशासनाने तत्काळ उपाययोजना केल्या आहेत. सुरक्षेच्या आणि वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने ‘मूड इंडिगो’च्या सर्व कार्यक्रमांसाठी करण्यात आलेली पूर्वनोंदणी रद्द करण्यात आली आहे. तसेच स्पर्धांमधील नोंदणीकृत सहभागी आणि आयआयटी बॉम्बेतील कॅम्पस रहिवासी वगळता इतर बाहेरील व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
परिस्थितीचा सातत्याने आढावा घेऊन पुढील निर्णय घेतले जातील, असेही आयआयटी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. या वेळी शिवसेना-मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: कच्चे तेल 72 डॉलरवर घसरले! देशात पेट्रोल-डिझेल-CNG चे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात किती आहे भाव?

Ketan Agarwal Murder : साखरपुडा, प्रेमसंबंध अन् टक्कल वादातून उलगडले रहस्य! सिया गोयलच्या भावाला चेतनच्या नात्याबद्दल माहिती होती

Shaktipeeth Highway : "सागरेश्वर अभयारण्यातून 'शक्तिपीठ' नेण्याचा निर्णय तातडीनं बदला, अन्यथा फडणवीसांच्या 'वर्षा' निवासस्थानासमोर आत्मदहन करणार"

'नवऱ्यापेक्षा जास्त मी तुझ्यावर प्रेम करते' चाहतीनं भर कार्यक्रमात शाहरुखला केलं प्रपोज, किंग खान म्हणाला...'एकट्यात सांगायचं ना...'

Latest Marathi News Live Update : बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या पुत्राची चौकशी

SCROLL FOR NEXT