मुंबई

यशवंत विद्यालयात क्रीडोत्सवाचा जल्लोष

CD

यशवंत विद्यालयात क्रीडोत्सवाचा जल्लोष
कबड्डीच्या रणांगणावर विद्यार्थ्यांचा जोश; यशवंत विद्यालयात क्रीडा महोत्सव उत्साहात
उल्हासनगर, ता. १८ (वार्ताहर) : यशवंत विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सवाअंतर्गत कबड्डी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांचे उद्‍घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले असून, विद्यार्थ्यांच्या सहभागाने संपूर्ण परिसर क्रीडामय झाला.
यशवंत विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सवाअंतर्गत कबड्डी स्पर्धांचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या स्पर्धांचे उद्‍घाटन ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विलास चौधरी होते. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष बापू सावंत, सचिव सुधाकर ढाके, सहखजिनदार विकास नेहेते, माजी अध्यक्ष नाना सावंत, संस्थापक भाऊसाहेब सावंत, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक विजय येवले, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रमोद नेहते आणि क्रीडा शिक्षक यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
उद्‍घाटनप्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कबड्डीसारख्या देशी खेळातून शारीरिक तंदुरुस्ती, आत्मविश्वास, संघभावना व शिस्त विकसित होते, असे प्रतिपादन केले. खेळासोबत शिक्षणाचा समतोल साधण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण खेळ, चपळाई आणि संघनिष्ठा दाखवत उपस्थितांची मने जिंकली. शिक्षकवृंदांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनामुळे स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्या. विद्यार्थ्यांचा उत्साह, जल्लोष आणि शिस्तबद्ध सहभाग यामुळे क्रीडा महोत्सवाची रंगत अधिकच वाढली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मान्यवरांनी विद्यालय प्रशासन, क्रीडा शिक्षक आणि सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. क्रीडास्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालय सातत्याने प्रयत्नशील असल्याचे या वेळी स्पष्ट झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : "...तर सेवेचा राजीनामा द्या अन् संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा"; राज ठाकरेंची IPS विश्वास नांगरे पाटलांवर टीका

Malvan Swimming Pool VIDEO : काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! स्विमिंग पूलमध्ये उंचावरून मारली उडी, डोकं तळाशी जोरात आपटलं, 25 वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत

Latest Marathi News Live Update : विशाळगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात; मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

Mumbai Water Supply: मुंबईवर कपातीचे संकट! धरणांनी गाठला तळ, अत्यल्प पावसामुळे चिंता

Video Viral: जग पाहता येत नाही... पण बापाच्या शब्दांनी रोनाल्डोचा गोल अनुभवला; लेकाची रिअ‍ॅक्शन डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT