मुंबई

वायबग्योर गोरेगाव संघाला दुहेरी मुकुट

CD

वायबग्योर गोरेगाव संघाला दुहेरी मुकुट
पीव्हीजी बास्केटबॉल स्पर्धा

घाटकोपर, ता. १८ (बातमीदार) : पीव्हीजी शाळेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘पीव्हीजी कॉन्क्वेस्ट गेम्स २०२५’ अंतर्गत बास्केटबॉल स्पर्धेत वायबग्योर गोरेगाव संघाने दुहेरी मुकुट पटकावले.
११ वर्षांखालील मुलींच्या गटात वायबग्योर गोरेगाव संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या गटात सिंघानिया संघाला द्वितीय आणि सोमय्या संघाला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. १४ वर्षांखालील मुलींच्या गटातही वायबग्योर गोरेगाव संघाने विजेतेपदावर आपले नाव कोरले. सेंट अँथनीज संघ उपविजेता ठरला, तर सिंघानिया संघ तृतीय क्रमांकावर राहिला. १६ वर्षांखालील मुलींच्या गटात सेंट अँथनीज संघाने प्रथम क्रमांकावर मोहर उमटवली. फातिमा संघ द्वितीय आणि सिंघानिया संघ तृतीय क्रमांकावर राहिले.
विजेत्या संघांना समन्वयिका शुभांगी जाधव यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, सन्मानपत्रे व पदके प्रदान करण्यात आली. या स्पर्धेसाठी बास्केटबॉल प्रशिक्षक सोनी झोरे यांचे सहकार्य लाभले. या क्रीडा महोत्सवाचे आयोजन पीव्हीजी शाळेचे कार्याध्यक्ष राजेंद्र बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.

मुलांमध्ये बॉम्बे स्कॉटिशला विजेतेपद
११ वर्षांखालील मुलांच्या गटात बॉम्बे स्कॉटिश संघाने विजेतेपद पटकावले, तर सिंघानियाने द्वितीय आणि पीव्हीजी ‘ए’ संघ तृतीय क्रमांकावर राहिला. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात वायबग्योर गोरेगाव संघ विजेता ठरला, तर बॉम्बे स्कॉटिश आणि सिंघानिया संघांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. १६ वर्षांखालील मुलांच्या गटात बॉम्बे स्कॉटिश संघाने विजेतेपद आपल्या नावे केले. या गटात स्कॉटिश आणि बॉम्बे संघांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Traffic Jam: मुंबई-पुणे ‘द्रुतगती महामार्गा’वर गॅस टँकर उलटला!, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

WPL 2026: जेमिमाहची दिल्ली कॅपिटल्स सलग चौथ्यांदा फायनलमध्ये, गुजरातचा केला पराभव; जेतेपदासाठी RCB शी लढणार

Mumbai Airport incident : मुंबई एअरपोर्टवर भीषण विमान दुर्घटना टळली! ; एअर इंडिया अन् इंडिगो विमानांची पंख एकमेकांना धडकली

मोठी बातमी! ‘टीईटी’त साडेचार लाखातील चार लाख भावी शिक्षक नापास; मराठीचा १२ टक्के तर इंग्रजीचा निकाल ५.४४ टक्के, ३६ जणांचा निकाल ठेवला राखून, वाचा...

Pune Traffic : जेधे चौकात जीव धोक्यात! अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालकांमुळे पादचाऱ्यांची रोजची कसरत

SCROLL FOR NEXT