मुंबई

वय वर्ष ९६, तरीही लोकशाहीवर अढळ निष्ठा

CD

वय वर्ष ९६, तरीही लोकशाहीवर अढळ निष्ठा
बदलापुरात चंद्रभागा आजींचे प्रेरणादायी मतदान
बदलापूर, ता. २० (बातमीदार) : मतदान हाच आपला खरा अधिकार आहे, असे म्हणत बदलापूर पूर्व परिसरातील ९६ वर्षांच्या चंद्रभागा गमरे यांनी वयावर मात करून मतदानाचा हक्क बजावला. कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या पाच प्रभागांसाठी होत असलेल्या मतदानात आजींच्या या उत्साहाने केवळ प्रभाग क्रमांक १५ ‘ब’च नव्हे, तर संपूर्ण बदलापूरकरांचे लक्ष वेधून घेतले.

२ डिसेंबरला झालेल्या मुख्य मतदानानंतर, आज केवळ स्थगित झालेल्या पाच प्रभागांसाठी फेरमतदान पार पडले. मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच, बदलापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या शंका फोल ठरवल्या आहेत. चालण्या-फिरण्यावर मर्यादा असतानाही आजींनी मतदान केंद्रापर्यंत येऊन लोकशाहीप्रती आपली कर्तव्यनिष्ठा सिद्ध केली. चंद्रभागा आजी मतदान केंद्रावर पोहोचताच तिथे उपस्थित असलेल्या तरुण मतदारांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये कौतुकमिश्रित उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मतदान केल्यानंतर त्यांनी अतिशय सकारात्मक ऊर्जेने नागरिकांना घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या कृतीमुळे अनेक मतदार, विशेषतः ज्येष्ठ नागरिक मतदानासाठी प्रेरित झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

जबाबदारीची जाणीव महत्त्वाची
वय महत्त्वाचे नसते, तर जबाबदारीची जाणीव महत्त्वाची असते, हेच आजींनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. बदलापूरमधील या निवडणुकीत आजींच्या सहभागामुळे लोकशाहीचा हा क्षण खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरला असून, दिवसभर सर्वत्र त्यांच्या या जिद्दीची चर्चा रंगली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT