मुंबई

भिवंडीत दुसऱ्या दिवशी ५५६ नामनिर्देशन अर्जांची विक्री

CD

भिवंडी, ता. २४ (वार्ताहर) : भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेला मंगळवार (ता. २३)पासून सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशीही उमेदवारांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतल्याचे चित्र दिसून आले. बुधवारी तब्बल ५५६ नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली असली, तरी प्रत्यक्षात केवळ एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. दोन दिवसांत एकूण १०५२ नामनिर्देशन अर्जांची विक्री झाल्याची माहिती पालिका जनसंपर्क विभागाने दिली.
पालिका निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १ यांच्या कार्यालयातून ५० अर्जांची विक्री करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक २ यांच्या कार्यालयातून ९१, क्रमांक ३ मधून ७०, क्रमांक ४ मधून सर्वाधिक १४७, क्रमांक ५ मधून ७८, क्रमांक ६ मधून ४१ तर निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक ७ यांच्या कार्यालयातून ७९ नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली. अशा प्रकारे बुधवारी एकूण ५५६ अर्ज विकले गेले.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक ६ यांच्या कार्यालयात एका अपक्ष उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक प्रक्रियेची सुरुवात झाली असली, तरी उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत इच्छुक उमेदवारांकडून अद्याप सावध भूमिका घेतली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. अंतिम तारखेजवळ येताच अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय! सात दिव्यांग शाळांतील विद्यार्थ्यांचे होणार समायोजन; दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांचे सीईओंना निर्देश..

Pune Crime: जागेच्या वादावरून दिराकडून सख्या भावजयीवर कोयत्याने सापासप वार; आंबेगाव तालुक्यात खळबळ, आधी दिली हाेती धमकी!

Gas Price: महागाईच्या काळात दिलासा! गॅस दरात मोठी घसरण; नवे दर काय अन् कधीपासून लागू होणार? जाणून घ्या...

आजपासून बदलणार 'या' राशींचं नशीब फळफळणार ! नव्या वर्षापर्यंत पैशांची बरसात आणि कामात यश

Pune Crime : मुलीशी बोलण्याच्या कारणावरून तरुणाचा खून; कोथरूडमधील सहा आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT