मुंबई

भिवंडी महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टी ९० जागांवर उमेदवार देणार

CD

भिवंडीत आप ९० जागा लढणार
शहर अध्यक्ष मसिह इकबाल यांची माहिती
भिवंडी, ता. २६ (वार्ताहर) ः भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी (आप) पहिल्यांदाच रिंगणात उतरणार आहे. पक्षाने ही निवडणूक कोणासोबत युती-आघाडी न करता स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वच्या सर्व ९० जागा लढविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती भिवंडी शहर अध्यक्ष मसिह इकबाल व महासचिव हणमंत जाधव यांनी पत्रकारांना दिली.
पक्षाकडून सुशिक्षित, चारित्र्यवान, सक्षम, स्वच्छ प्रतिमेचे आणि स्थानिक प्रश्नांची जाण असलेले उमेदवार शोधण्याची प्रक्रिया वेगात सुरू आहे. आतापर्यंत ३० जागांसाठी उमेदवारांची प्राथमिक छाननी पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरित जागांसाठी स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद सुरू आहे, अशी माहिती ॲड. हणमंत जाधव यांनी दिली. भिवंडी शहरातील खड्डेमय व अपूर्ण रस्ते, मोहल्ला क्लिनिक, पालिका प्रशासनातील भ्रष्टाचार, अपुऱ्या आरोग्य सुविधा, पाणीटंचाई, स्वच्छतेचा अभाव आणि नागरी सुविधांचा बोजवारा या प्रमुख मुद्द्यांवर आम आदमी पार्टी निवडणूक लढवणार आहे. दिल्ली व पंजाबमध्ये राबवलेल्या शिक्षण, आरोग्य आणि पारदर्शक प्रशासनाच्या मॉडेलचा अनुभव भिवंडीकरांना देण्याचा प्रयत्न असेल, असा दावा पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. आतापर्यंत प्रस्थापित पक्षांमधील राजकारणाने त्रस्त झालेल्या नागरिकांना एक नवा, पर्यायी आणि विश्वासार्ह पर्याय देण्याच्या उद्देशाने आम आदमी पार्टी मैदानात उतरल्याने, भिवंडी महापालिका निवडणुकीत या वेळी राजकीय वातावरण अधिक रंगतदार होणार असल्याचे ॲड. हणमंत जाधव यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari Defamation Case : इंस्टाग्रामवर नितीन गडकरी यांची बदनामी; आयटी सेलच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

Akola News : बिश्नोई गॅंगचा धक्कादायक खंडणी कॉल!आमदाराकडे २ कोटींची मागणी; भाजप शहराध्यक्षाला जीवघेणी धमकी

Amravati MD Drugs Seized : अमरावतीत महिन्याभरात तिसऱ्यांदा एमडी ड्रग्स जप्त ; तस्करीची पाळेमुळे खोलवर रुतलेली

Shiv Jayanti Mohol : मोहोळ तालुक्यात 40 ठिकाणी "एक गाव एक शिवजयंती" उपक्रम विविध मंडळांचा सामाजीक उपक्रमावर भर

Vasai Vasai News : वसईत सीरियल शूटिंग सेटला आग, स्टुडिओचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT