रेल्वे कारशेड सुविधांसाठी कळवावासिय आक्रमक
कळवा मुंब्रा रेल्वे प्रवासी संघर्ष समितीकडून जनजागृती मोहिम ः पाच हजार नागरिकांचा पाठिंबा
कळवा, ता. २७ (बातमीदार) ः अनधिकृत प्रवासी वाहतुकीचा मुद्दा पुढे करून मध्य रेल्वेने कळव्यातील कारशेड प्रवासी वाहतूक बंद करण्याचे ठरविले आहे. याविरोधात कळवा मुंब्रा रेल्वे प्रवासी संघर्ष समिती आक्रमक झाली असून सह्यांद्वारे जनजागृती अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. यासाठी रेल्वे प्रवासी सुरक्षा समितीने रेल्वे महाप्रबंधक यांची भेट घेऊन कळवेकरांच्या कारशेडबाबतच्या मागणीसह इतरही काही मूलभूत मागण्यांचे निवेदन दिले आहे.
कळवा रेल्वे स्थानकामधून मुंबईकडे प्रवास करणे कठीण होत चालले आहे. तर, कल्याणकडून येणाऱ्या सर्वच लोकल भरून येत असल्याने दरवाजात लटकून प्रवास करावा लागतो. यामुळे कळवा-ठाणे खाडीत पडून आजवर कित्येक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यावर पर्याय म्हणून कळव्यातील बहुसंख्य नागरिक कारशेडमधून सुटणाऱ्या गाड्यांनी रोज मुंबईकडे प्रवास करतात. परंतु, आता रेल्वे प्रशासनाने अनधिकृत प्रवासी वाहतुकीचा मुद्दा पुढे करून ही सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याविरोधात कळवा-मुंब्रा प्रवासी संघर्ष समितीने जनजागृती अभियान सुरु केले आहे. या अभियानात नगरसेवकांनीही पत्र देऊन सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. कळव्यातील ज्येष्ठ माजी नगरसेवक मिलिंद पाटील तथा समाजसेवक मंदार केणी यांनी याबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा करून कारशेड सुविधा बंद करण्यापूर्वी कळवाकरांना आधी होम प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.
कळव्यात कारशेडजवळ होम प्लॅटफॉर्म तयार व्हावा यासाठी सह्यांच्या जनजागृती मोहिमेत जवळपास पाच हजार नागरिकांनी पाठिंबा दिला आहे. पुढील आठवड्यात कळवा नाका, खारेगाव नाका, कळवा पूर्व या भागात जनजागृती केली जाणार आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र कणार असल्याचे समितीचे संयोजक प्रथमेश उपरकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.