खारघर (बातमीदार) : वाईन शॉपमधील काउंटरवरून रोख रक्कम घेऊन पळ काढणाऱ्या तरुणाविरोधात खारघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तेजस वास्कर याला अटक केली आहे. तो पेठगावातील रहिवासी आहे. खारघर सेक्टर सहामधील कोल्ड कॉइन वाईन मार्ट दुकानात शनिवारी (ता. २७) रात्री ही घटना घडली.