मुंबई

आंबेमोरा गावात बिबट्याची दहशत

CD

आंबेमोरा गावात बिबट्याची दहशत
शेळीची शिकार केल्यानंतर वन विभागाकडून सापळा तैनात
तारापूर, ता. २९ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील आंबेमोरा परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी (ता. २६) सायंकाळी सौदागरवाडी येथे बिबट्याने एका राजस्थानी तोतापुरी शेळीची शिकार केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे.
शाबाज सौदागर यांच्या मालकीच्या शेळ्या चरत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे २५ हजार रुपये किमतीची शेळी ठार झाली. आंबेमोरा परिसर चिकूच्या वाड्या आणि घनदाट झाडीने वेढलेला असल्याने येथे वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत वन विभागाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. वनपाल समाधान पाटील, वाईल्ड लाईफ कंझर्वेशन अँड ॲनिमल वेल्फेअर असोसिएशनचे मानद जीव रक्षक हार्दिक सोनी, रोहन डिक्रुझ, पूर्वेस तांडेल व रेमंड डिसोझा यांनी रविवारी (ता. २८) सौदागरवाडी परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सापळा लावला आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडू नये आणि आपल्या पशुधनाची सुरक्षितता राखावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SSC Exam Paper Leak : दहावीचा गणिताचा पेपर तीन दिवस आधीच फुटला, टेलिग्रामवर प्रश्नपत्रिका व्हायरल, बोर्डाच्या सुरक्षाव्यवस्थेवरच प्रश्नचिह्न

Jalgaon : अंत्यसंस्काराला गेलेल्यांवर मधमाशांचा हल्ला, मृतदेह तसाच सोडून पळाले; १० जण गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : गॅस तुटवड्यावर तोडगा न निघाल्यास ठाण्यातील ७० टक्के हॉटेल्स बंद होणार

Gold Investment Returns : सोने गुंतवणुकीने दोन महिन्यांत तब्बल 28 हजारांचा परतावा; इराण-अमेरिका युद्धानंतरही भावात घसरण, सुवर्ण बाजारात अस्थिर वातावरण

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा उलटफेर! MCX बाजारात दर घसरले; आज 1 तोळा सोनं कितीला?

SCROLL FOR NEXT