मुंबई

भंगार गोळा करणाऱ्याकडे गावठी कट्टा

CD

उल्हासनगर, ता. ३१ (वार्ताहर) : निवडणूक व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक बंदोबस्त असतानाही गुन्हेगारी वृत्ती डोके वर काढत असल्याचे चित्र समोर आले आहे. भंगार गोळा करण्याचा व्यवसाय करणाऱ्या एका तरुणाकडे गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस आढळून आल्याने उल्हासनगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला अटक केली. मनाई आदेश लागू असतानाही शस्त्र बाळगल्याने शहरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
शस्त्र बाळगण्यावर लागू असलेल्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी खंडू ऊर्फ खंड्या जाधव (वय ३० वर्ष) याला अटक केली आहे. एमआयडीसी पाण्याच्या टाकीच्या कम्पाउंडजवळ, देशमुखनगर, उल्हासनगर-२ येथे संशयास्पद हालचाली आढळून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्याच्याकडे कोणताही परवाना नसताना एक गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस आढळून आले. ही कारवाई पोलिस उपायुक्त सचिन गोरे, वरिष्ठ निरीक्षक संतोष आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भूषण खैरनार यांनी केली. जाधव विरोधात गुन्हा दाखल केला असून, शस्त्र कुठून व कोणत्या उद्देशाने बाळगले होते, याचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, SA vs NZ Semi: दक्षिण आफ्रिकेसोबत चिटिंग झाली? एडन मार्करमची विकेट ढापली? 'त्या' कॅचवरून वाद पेटला Video

मुंबईत २ लाख ट्रक चालक-मालक धडकणार, ई-चालान प्रणालीविरोधात उतरणार रस्त्यावर

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Pune Fraud : मेट्रोसाठी सिमेंट-स्टील पुरवठ्याच्या आमिषाने पावणे चार कोटींची फसवणूक

Kamthi News : नागपूर हादरल! रंग उडवल्याच्या रागातून आजीने नातवावर ओतले उकळते पाणी

SCROLL FOR NEXT