२२७ जागांसाठी एकूण २,५१६ अर्ज
अखेरच्या दिवशी उमेदवारांची गर्दी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेने मंगळवारी (ता. ३०) अंतिम दिवशी उच्चांक गाठला. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मुंबईतील २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती. दिवसभरात दोन हजार १२२ अर्ज दाखल झाले असून, आजअखेर एकूण अर्जांची संख्या दोन हजार ५१६ वर पोहोचली आहे.
छाननीनंतर जे उमेदवार अपात्र ठरतील त्यांची नावे बाद होतील. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार उरतात, याकडे संपूर्ण सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
अर्जांचा पाऊस
निवडणूक कार्यक्रमानुसार २३ डिसेंबरपासून अर्ज वाटपास सुरुवात झाली होती. ३० डिसेंबरपर्यंत एकूण ११ हजार ३९१ कोऱ्या अर्जांचे वितरण झाले. त्यापैकी दोन हजार ५१६ उमेदवारांनी आपले अर्ज प्रत्यक्ष सादर केले. शेवटच्या दिवशीही ५९४ कोरे अर्ज नेण्यात आले, तर विक्रमी दोन हजार १२२ अर्ज स्वीकारण्यात आले.
एम-पूर्व विभाग आघाडीवर
प्रशासकीय विभागानुसार पाहिल्यास एम-पूर्व विभागातून सर्वाधिक १८२ अर्ज प्राप्त झाले आहेत, तर त्यापाठोपाठ एम-पश्चिममधून १६४ अर्ज आले आहेत. दक्षिण मुंबईतील ए, बी, ई विभागांत १५० उमेदवारांनी नशीब अजमावले आहे. सर्वात कमी चुरस आर-मध्य विभागात दिसत असून, तिथे केवळ ५१ अर्ज दाखल झाले आहेत.
प्रमुख विभागांमधील एकूण प्राप्त अर्ज
ए+बी+ई (१५०), जी-उत्तर (१३७), के-पश्चिम (१३३), एस विभाग (१२५), एच-पूर्व (१२५), एन विभाग (१२३), एफ-उत्तर (११८), पी-पूर्व (११७), एल विभाग (११६), टी विभाग (१०९) आणि आर-दक्षिण (१०९).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.