मुंबई

माजी उपमहापौरांना उपनिबंधकांचा दणका

CD

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३१ : सहकारी संस्थांच्या कारभारात पारदर्शकता, आर्थिक शिस्त आणि प्रामाणिकपणा या मूलभूत मूल्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर अखेर कठोर कारवाई करण्यात आली आहे. नेरुळ सेक्टर-२८ येथील श्री गणेश सहकारी हौसिंग सोसायटीवरील व्यवस्थापक समिती सदस्य आणि माजी उपमहापौर अशोक गावडे यांना पदावरून हटविण्याचा आदेश नवी मुंबई उपनिबंधक, सहकारी संस्था (सिडको) यांनी दिला आहे.

उपनिबंधक प्रताप पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार, गावडे हे वाशीतील साधना सहकारी बँकेतील तीन कोटी ४१ लाखांचे थकबाकीदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्जवसुलीसाठी बँकेने त्यांच्या मालमत्तेवर जप्तीची प्रक्रिया सुरू केली असून, यासंदर्भातील न्यायालयीन आदेशही अस्तित्वात असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष व सचिवांनी ३० जून रोजी उपनिबंधक कार्यालयाकडे पत्राद्वारे ही बाब निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर उपनिबंधक कार्यालयाने कारणे दाखवा नोटीस बजावून सुनावण्या घेतल्या. या सुनावणीदरम्यान गावडे यांनी कर्जफेडीची प्रक्रिया सुरू असल्याचा दावा केला. काही रक्कम भरल्याचे नमूद केले, मात्र संस्थेच्या निवडणुकीच्या वेळी ते बँकेचे थकबाकीदार होते, तसेच त्यांच्या मालमत्तेवर जप्तीचे आदेश अस्तित्वात होते, हे बँकेची पत्रे, न्यायालयीन आदेश आणि इतर पुराव्यांवरून स्पष्ट झाले.

केवळ आंशिक रक्कम भरणे किंवा न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्यामुळे थकबाकीदारपणातून मुक्ती मिळत नाही, असे उपनिबंधकांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर अशोक गावडे यांना तत्काळ व्यवस्थापक समिती सदस्यत्वावरून अपात्र ठरविण्यात आले असून, त्यांची जागा रिक्त झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. याशिवाय, पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी कोणत्याही सहकारी संस्थेच्या समितीवर निवडून येणे, नियुक्त होणे किंवा नामनिर्देशित होण्यास त्यांना बंदी घातली आहे.

माझ्यावर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही. उपनिबंधकांनी जो आदेश दिला आहे, त्यावर मी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अपील केले आहे. त्या अपिलावर सुनावणीदरम्यान स्थगिती आदेश येईल.
- अशोक गावडे, माजी उपमहापौर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: प्रेयसीचा मॅसेज आला अन् भेटायला गेला …; काही तासांतच आईला फोन, प्रेमसंबंधातून तरूणाला संपवलं, कोथरूडमध्ये काय घडलं?

LPG गॅस कमतरतेच्या अफवा वाढल्या अन् प्ले स्टोअरवर झाला धूमाकुळ; नंबर 1 डाउनलोडवर पोहोचले 'हे' ॲप, जाणून घ्या का वाढली डिमांड

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

अरे व्वा! अनुष्का शेट्टी लवकरच करणार लग्न? वयाच्या 44 व्या वर्षी व्यावसायिकासोबत बांधणार लग्नगाठ?

Rasgulla Choking Death : लग्नात जेवताना घशात रसगुल्ला अडकल्याने मृत्यू, विचित्र घटनेने सगळेच हादरले; डॉक्टरांनी सांगितले नेमके कारण

SCROLL FOR NEXT