मुंबई

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी टिटवाळ्यात भक्तिसागर उसळला

CD

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी टिटवाळ्यात भक्तिसागर उसळला
सिद्धिविनायक मंदिर परिसर जत्रेसारखा फुलला, भाविकांची विक्रमी गर्दी
टिटवाळा, ता. १ (वार्ताहर) : सरत्या वर्षाला निरोप देत आणि नववर्षाची मंगलमय सुरुवात करण्यासाठी राज्यभरातील भाविकांनी देवदर्शनाचा मार्ग धरला आहे. पंढरपूर, शिर्डी, वणी, तुळजापूर, देहू, आळंदीप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातही नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. मुख्य रस्ता, मंदिर परिसर आणि आजूबाजूचा भाग अक्षरशः भाविकांनी फुलून गेला होता.
मुंबई, ठाणे आणि आसपासच्या विविध भागांतून भाविक आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने आले होते. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर निनादून गेला होता. बाप्पाच्या दर्शनासोबतच भाविकांनी मंदिराच्या आवारात असलेल्या तलावात बोटिंगचा आनंद घेतला. लहान मुलांसाठी असलेल्या खेळणी, फुगे, खाद्यपदार्थांच्या स्टॉल्समुळे मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. येथील फुलविक्रेते आणि पूजा साहित्य विक्रते यांनी गणेशभक्तांच्या वाढत्या गर्दीमुळे समाधान व्यक्त केले.
या वेळी नरेंद्र महाराज संप्रदायाचे सेवेकरीही गणेशभक्तांच्या सेवेसाठी उपस्थित होते. त्यांनी भाविकांना रक्तदानाचे महत्त्व समजावून सांगत रक्तदान करण्याचे आवाहन केले. भक्ती, सेवा, उत्साह आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम टिटवाळ्यात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळाला. नववर्षाच्या शुभारंभाला बाप्पाच्या दर्शनाने लाभलेली ही भक्तिसागराची अनुभूती भाविकांसाठी अविस्मरणीय ठरली.

चोख व्यवस्था
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून भाविकांसाठी विशेष तयारी करण्यात आली होती. रांग व्यवस्थापन, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह यांसारख्या सुविधा यासह आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता टिटवाळा पोलिस स्थानकाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काही काळ वाहतूक कोंडीमुळे नागरिकांची गैरसोय झाली, मात्र पर्यायी रस्त्यांचा वापर करून वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यात आले आणि भाविकांची गैरसोय टाळण्यात आली.

गणेशभक्तांच्या गर्दीमुळे संपूर्ण परिसरात चैतन्याचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पहाटे चार वाजल्यापासून मंदिर गणेशभक्तांसाठी खुले करण्यात आले होते. गेल्या १० वर्षांपासून नववर्षाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनाने करण्याची परंपरा सुरू झाली आणि आजही ती कायम आहे. तर सकाळपासून एक लाख भाविकांनी दर्शन घेतले.
- सुभाष जोशी, मंदिर विश्वस्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

Phaltan News: पाइपमध्‍ये अडकून तिघांचा मृत्‍यू; फलटण तालुक्यातील पाेटपाटातील घटना, तिघेही ओरिसातील पाेल्‍ट्री कामगार, काय घडलं!

Dharashiv News: उमरग्यात गॅससाठी लांब रांगा; बुकिंग केल्यानंतरही १५ दिवस प्रतीक्षा;सिलिंडर उशिरा मिळत असल्याने ग्राहक त्रस्त

Parbhani Gas Booking Trouble: गॅस सिलिंडर बुकिंग सर्व्हर डाउन, ऑनलाइन नोंदणी ठप्प, परभणी गॅस एजन्सी गर्दी

बोर्डाचे शिक्षकांना आदेश! दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी शाळेतच बंधनकारक; २१ दिवसांसाठी २१ दिवसांची मुदत, आता उत्तरपत्रिकांचे गठ्ठे इतिहासजमा

SCROLL FOR NEXT