मुंबई

अडीच वर्षांत तयार होईल वांद्र्यातील कर्करोग रुग्णालय

CD

अडीच वर्षांत तयार होईल वांद्र्यातील कर्करोग रुग्णालय
‘सकाळ संवाद’ कार्यक्रमात आशीष शेलार यांची ग्वाही

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : मुंबई शहरात परवडणारे किंवा मोफत कर्करोग उपचार घेऊ इच्छिणाऱ्या हजारो रुग्णांसाठी वांद्रे येथील प्रस्तावित कर्करोग रुग्णालय येत्या अडीच वर्षांत पूर्ण होईल, असे आश्वासन मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी शुक्रवारी (ता. २) ‘सकाळ संवाद’ कार्यक्रमात दिले.
शेलार यांनी या वेळी सांगितले, की या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. ऑटोमिक एनर्जीची एक परवानगी शिल्लक आहे. ती मिळाल्यास उर्वरित कामेही मार्गी लागतील आणि अडीच वर्षांत या रुग्णालयात रुग्णसेवा सुरू होईल. १७४ खाटांच्या या रुग्णालयाच्या उभारणीसाठी महापालिकेकडून २१३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईसह देशभरात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या मुंबईतील कर्करोग उपचाराचा मुख्य भार परळ आणि खारघर येथील टाटा मेमोरियल सेंटरने उचलला आहे, तर राज्य सरकारच्या कामा रुग्णालयात आणि महापालिकेच्या नायर रुग्णालयात रेडिओथेरपी दिली जाते. याशिवाय महिलांच्या गर्भाशयाच्या आणि स्तनाच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी कामा रुग्णालय उपलब्ध आहे.
कर्करोगाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी वांद्रे येथील भाभा रुग्णालयाजवळील भूखंडावर स्वतंत्र कर्करोग रुग्णालय बांधण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे केली होती. तत्कालीन महापालिका आयुक्त इक्बाल सिंग यांनी ते बांधण्यास मंजुरी दिली होती. या मंजुरीनंतर महापालिकेच्या वास्तुविशारदांनी कर्करोग रुग्णालय बांधण्याची प्राथमिक रूपरेषा तयार केली आहे. रूपरेषा तयार झाल्यानंतर रुग्णालय इन्फ्रास्ट्रक्चर सेलने (एचआयसी) त्याच्या बांधकामासाठी निविदा काढली होती. या निविदा प्रक्रियेत एनसीपीएल-शेठ नावाची संयुक्त भागीदारी कंपनी पात्र ठरली.
...
दहा मजली इमारत
वांद्रे रुग्णालयाजवळच्या पेटकर मार्गावर असलेला २,५२५ चौरस मीटरचा भूखंड सध्या महापालिकेच्या सुविधांसाठी आरक्षित आहे. त्यावर रुग्णालयाची दहा मजली इमारत बांधली जाणार आहे. यामध्ये सुमारे १३ हजार चौरस मीटरच्या बिल्टअप क्षेत्रासह दोन तळघरे असतील. पालिकेच्या भाभा रुग्णालयाच्या समोर हे रुग्णालय तयार होईल.
...
या सुविधा असतील
- या रुग्णालयात आयसीयू, केमोथेरपी, ब्रेकीथेरपीपासून रेडिओथेरपीपर्यंत सर्वसमावेशक कर्करोगाच्या काळजीसाठी अत्याधुनिक सुविधा असतील.
- १३ हजार स्क्वेअर मीटर या क्षेत्रफळातील रुग्णालयात एक ते आठ मजल्यांमध्ये उपचाराची सुविधा उपलब्ध होणार आहे.
- ९ ते १० मजल्यांमध्ये अधिकारी, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या राहण्याची सोय आहे.
- या इमारतीत रेडिओथेरपीसाठी दोन बंकर रूम, १२ ओपीडी वॉर्ड, बायोकेमिस्ट्री, हिस्टोपॅथॉलॉजी, हेमेटोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीसह पाच प्रयोगशाळा असतील.
- डायग्नोस्टिक्समध्ये मॅमोग्राफी आणि पीईटी-सीटी युनिट्सदेखील असतील.
- रुग्णालयाच्या इमारतीमध्ये लेक्चर हॉल, सेमिनार हॉल, रक्तपेढी आणि आयसोलेशन वॉर्डही असेल.
- रुग्णांच्या कुटुंबीयांसाठी राहण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SSC Exam Paper Leak : दहावीचा गणिताचा पेपर तीन दिवस आधीच फुटला, टेलिग्रामवर प्रश्नपत्रिका व्हायरल, बोर्डाच्या सुरक्षाव्यवस्थेवरच प्रश्नचिह्न

Jalgaon : अंत्यसंस्काराला गेलेल्यांवर मधमाशांचा हल्ला, मृतदेह तसाच सोडून पळाले; १० जण गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : गॅस तुटवड्यावर तोडगा न निघाल्यास ठाण्यातील ७० टक्के हॉटेल्स बंद होणार

Gold Investment Returns : सोने गुंतवणुकीने दोन महिन्यांत तब्बल 28 हजारांचा परतावा; इराण-अमेरिका युद्धानंतरही भावात घसरण, सुवर्ण बाजारात अस्थिर वातावरण

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा उलटफेर! MCX बाजारात दर घसरले; आज 1 तोळा सोनं कितीला?

SCROLL FOR NEXT