मुंबई

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

CD

प्रसाद चिकित्सा संस्थेतर्फे सावित्रीबाई फुले जयंती साजरी
वज्रेश्वरी, ता. ४ (बातमीदार) : प्रसाद चिकित्सा गणेशपुरी संस्थेच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती टोकरविरा येथे उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला परिसरातील महिला आणि विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
याप्रसंगी उपस्थित महिलांनी सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित गौरवगीते आणि प्रेरणादायी गाणी सादर केली. या गीतांच्या माध्यमातून सावित्रीबाईंच्या संघर्षाला उजाळा मिळाल्याने संपूर्ण वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना वक्त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या खडतर प्रवासावर आणि त्यांनी केलेल्या महान सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला. तत्कालीन काळात प्रचंड विरोधाचा सामना करून त्यांनी सुरू केलेले स्त्री शिक्षणाचे कार्य ही आजच्या आधुनिक समाजाची पायाभरणी आहे, असे मत यावेळी मांडण्यात आले. सावित्रीबाईंचे विचार आजही तितकेच प्रासंगिक असून स्त्री शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी परिसरातील महिला बचत गटातील ४५ महिला आणि जिल्हा परिषद शाळा टोकरविरा येथील ४५ विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रसाद चिकित्सा संस्थेचे अमोल अपसिंगेकर यांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व आणि सावित्रीबाई फुले यांचे समाजासाठी असलेले योगदान यावर सविस्तर प्रकाश टाकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Iran War : मोठा दिलासा ! जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती उतरल्या, डोनाल्ड ट्रम्प यांचे युद्ध संपविण्याचे संकेत

Jayant Patil: राज्य कर्जाच्या विळख्यात: आमदार जयंत पाटील यांचा सरकारवर घणाघात, घोषणांचा पाऊस आणि तरतुदींचा दुष्काळ!

Relief From Dangerous Potholes in Beed : सात वर्षांच्या संघर्षानंतर धानोरा रस्त्याला नवा श्वास; दोन टप्पे पूर्ण!

Satara Bribery Case: प्राध्‍यापक पदोन्नतीसाठी खटावमध्ये लाचखोरी; लाखोंच्‍या राेकडसह दाेन लोकसेवक ताब्यात, सातारा जिल्ह्यात उडाली खळबळ!

सोलापुरातील ‘या’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोलापूरचा लळा! कलेक्टर, सीपी, ॲडशनल एसपींचा कार्यकाळ पूर्ण; ५ अधिकाऱ्यांचाही कार्यकाळ ऑगस्टमध्ये संपणार, वाचा...

SCROLL FOR NEXT