मुंबई

मुंब्य्रात १४ लाखांच्या एमडी ड्रग्जसह एकाला अटक

CD

मुंब्य्रात १४ लाखांच्या एमडीसह एकाला अटक
मध्यवर्ती गुन्हे शाखेची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ ः मुंब्रा परिसरात अमली पदार्थांच्या विक्रीसाठी आलेल्या मुंब्रा-कौसा येथील अमिन गडकरी (२२) या तरुण ड्रग्ज तस्कराला ठाणे गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षाने अटक केली. त्याच्याकडून १४ लाख २४ हजार रुपये किमतीच्या ७१.२ ग्रॅम वजनाच्या एमडीसह १४ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांनी बुधवारी दिली.

मुंब्य्रातील कौसा भागातील काकानगर परिसरात अमिन हा एमडी पावडर विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे शहर पोलिस दलातील मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिस हवालदार धनराज घोडके आणि पोलिस शिपाई अशोक ढवळे यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव आणि मध्यवर्ती गुन्हे शोध पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक श्वेता चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक सुरेश माळोदे, धनराज घोडके, अंकुश शिंदे, योगेश क्षीरसागर, अशोक ढवळे आणि रविदास जाधव आदींच्या पथकाने मंगळवारी (ता. ६) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास अमिन याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीमध्ये एमडीसह १४ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. पुढील तपास मध्यवर्ती गुन्हे शाखा करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Flyover Video: उड्डाणपुलाच्या कामात तांत्रिक चूक? 'आप'ने शेअर केला विद्यापीठ चौकातील नवीन पुलाचा व्हिडीओ

Latest Marathi News Live Update : राज ठाकरेंनी व्यक्त केला पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीवर संताप

Thane News : ...तर पालिका अधिकाऱ्यांच्या घरात आंघोळीला जावे लागेल - अभिजीत पवार

Telegram: टेलिग्रामवर मोफत चित्रपट आणि वेब सिरीज पाहणाऱ्यांना धक्का! आता फुकट काही पाहता येणार नाही; केंद्र सरकारची मोठी कारवाई

Pachod Crime : रस्ता विचारण्याच्या बहाण्याने महिला मुख्याध्यापिकेला लुटले; मुरमा शिवारातील घटना

SCROLL FOR NEXT