मुंबई

पक्ष्यांचा अधिवास धोक्यात

CD

पक्ष्यांचा अधिवास धोक्यात
शिरगावात ‘आयबिस’ मृतावस्थेत आढळला
पालघर, ता.७ ः तालुक्यातील शिरगाव गावाच्या हद्दीतील चुनाभट्टी परिसरातील पाणथळ भागात काही दिवसांपूर्वी पांढरे बगळे मृत, अर्धमेल्या अवस्थेत आढळले होते. या घटनेच्या दोन-तीन दिवसानंतर आयबिस पक्षी मृतावस्थेत आढळला असल्याने पक्षीप्रेमीकडून चिंता व्यक्त होत आहे.
चुनाभट्टी खाडी पाणथळ परिसर असल्याने येथे विविध पक्ष्यांचे बस्तान आहे. पाणथळ जमिनीत योग्य खाद्य मिळत असल्याने स्थानिक पक्षी आणि स्थलांतरित पक्षी या भागात मोठ्या प्रमाणात वावरताना दिसत आहेत. मात्र, अलिकडच्या काळात भराव करून अनेक गृहनिर्माण संकुले उभी राहिली आहेत. त्यामुळे पक्ष्यांच्या अस्तित्वावर घातला जात आहे. गेल्या काही वर्षात पक्ष्यांची संख्या कमी झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
------------------------------------
रसायनांचा वापर
पाणथळ जमिनीवर पाण्यात कॅप्सूलमधून आणलेले रासायनिक द्रावण पाण्यात मिसळून पक्षांच्या शिकारीचा प्रयत्न होत आहे. पाणथळ पाण्यात काही विषारी द्रव मिसळल्याने मृत मासे खाल्ल्याने बगळे, पक्षी मृत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिरगाव येथील चुनाभट्टी भागात ६ ते ७ बगळे मृतावस्थेत तर तीन ते चार पक्षी अर्धमेल्या अवस्थेत आढळल्याची माहिती पर्यावरण प्रेमी अहमद नजीब खलिफा यांनी दिली.
-------------------------------------
दिसण्यामुळे महत्त्व
शिरगाव चुनाभट्टी परिसरात मृतावस्थेत आढळेला ब्लॅकहेडेड आयबीस या स्थलांतरित पक्ष्याला त्याच्या दिसण्यामुळे विशेष महत्त्व आहे. भारतासह, नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार, दक्षिण आशियाई देशात ब्लॅक हेडेड आयबीस म्हणजेच काळ्या डोक्याचा शराटी या पक्षाचे वास्तव्य आहे. भारतात पक्षी निवासी, स्थानिक स्थलांतर करणारे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: प्रेयसीचा मॅसेज आला अन् भेटायला गेला …; काही तासांतच आईला फोन, प्रेमसंबंधातून तरूणाला संपवलं, कोथरूडमध्ये काय घडलं?

LPG गॅस कमतरतेच्या अफवा वाढल्या अन् प्ले स्टोअरवर झाला धूमाकुळ; नंबर 1 डाउनलोडवर पोहोचले 'हे' ॲप, जाणून घ्या का वाढली डिमांड

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

अरे व्वा! अनुष्का शेट्टी लवकरच करणार लग्न? वयाच्या 44 व्या वर्षी व्यावसायिकासोबत बांधणार लग्नगाठ?

Rasgulla Choking Death : लग्नात जेवताना घशात रसगुल्ला अडकल्याने मृत्यू, विचित्र घटनेने सगळेच हादरले; डॉक्टरांनी सांगितले नेमके कारण

SCROLL FOR NEXT