मुंबई

उपप्रादेशिक कार्यालय व पोस्ट ऑफिस जीर्ण इमारतीत

CD

टपाल कार्यालयात जीवाला घोर
कासातील उपप्रादेशिक कार्यालय जीर्ण अवस्थेत
कासा, ता. ८ (बातमीदार)ः आदिवासी विकास महामंडळ मर्यादित, नाशिक विभागाचे उपप्रादेशिक तसेच कासा टपाल कार्यालय मोडकळीस आलेल्या इमारतीत आहेत. भाडेकरारावरील ही इमारत ४० ते ४५ वर्षे जुनी असल्याने कर्मचाऱ्यांना जीवावर उधार होऊन काम करावे लागत आहे.
इमारतीचे दरवाजे, खिडक्या तुटलेल्या, स्लॅब अनेक ठिकाणी नादुरुस्त आहेत. तरीदेखील आदिवासी विभागाचे कर्मचारी, शिपाई तसेच टपाल कार्यालयाचे कर्मचारी जीव मुठीत घेऊन इमारतीत काम करीत आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील अनेक नागरिक, महिला, वृद्ध, लहान मुले विविध योजनांसाठी दररोज कार्यालयात येत असल्याने मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण झाला आहे. काही वर्षांपूर्वी मंत्रालयातून आलेल्या आदिवासी आमदारांच्या समितीने कार्यालयास भेट देऊन इमारतीची पाहणी केली होती. तसेच इमारतीच्या दुरुस्तीचे आदेश दिले होते. मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या उदासीनतेचा फटका कर्मचाऱ्यांना बसण्याची शक्यता अधिक आहे.
---------------------------------
कर्मचाऱ्यांचा विमा काढण्याची वेळ
आदिवासी विकास विभागाच्या कासा कार्यालयातील अधिकारी एस. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, अनेक वर्षांपासून नवीन कार्यालयासाठी जागा शोधत आहोत. मात्र अटी-शर्तींमुळे जागा मिळणे कठीण जात आहे. ही इमारत अत्यंत जुनी, धोकादायक झाली आहे. जीव धोक्यात घालून काम करतो. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचा विमा काढल्याचे टपालमास्तर रवि सैनी यांनी सांगितले.
---------------------------------
टपाल मास्तर मराठी भाषक नसल्याने नागरिकांना विविध त्रास सहन करावा लागतो. अनेक वेळा भांडणाचे प्रसंग उद्भवले आहेत. त्यामुळे प्रशासनाने येथे मराठी भाषा समजणारे टपाल मास्तर नेमावेत.
- परमानंद धर्म मेहेर, ग्रामस्थ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monalisa Marriage: मुस्लिम तरुणासोबत लग्न केलं; पण वडिलांची भीती, घाबरलेल्या मोनालिसाची पोलिसात धाव अन्... व्हायरल गर्ल पुन्हा चर्चत

Latest Marathi News Live Update : मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीकडून सर्वधर्म रोजा इफ्तारचे आयोजन

स्वच्छता कंत्राटदारांना बसणार लगाम; आता नगरसेवकांच्या शिफारसीनंतरच मिळणार देयके, 'या' महानगरपालिकेचा मोठा निर्णय...

Pune Flyover Video: उड्डाणपुलाच्या कामात तांत्रिक चूक? 'आप'ने शेअर केला विद्यापीठ चौकातील नवीन पुलाचा व्हिडीओ

Thane News : ...तर पालिका अधिकाऱ्यांच्या घरात आंघोळीला जावे लागेल - अभिजीत पवार

SCROLL FOR NEXT