मुंबई

ब्राह्मण विद्यालय चरई येथे सांस्कृतिक आविष्कार

CD

ब्राह्मण विद्यालय चरई येथे सांस्कृतिक आविष्कार
वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

ठाणे, ता. ८ : ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या ब्राह्मण विद्यालय, चरई (पूर्वप्राथमिक व प्राथमिक विभाग) येथे नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत दिमाखात पार पडले. या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध लोककलांनी आणि सामाजिक संदेशांनी उपस्थितांची मने जिंकली. ब्राह्मण शिक्षण मंडळाचे विश्वस्त हेमंत दिवेकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषविले. ब्राह्मण शिक्षण मंडळाचे चिटणीस अ‍ॅड. श्री. केदार जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुख्याध्यापिका वंदना चव्हाण व पूर्वप्राथमिकच्या मुख्याध्यापिका सारिका दामले यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे माजी चिटणीस नंदकुमार जोशी साहेब यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर पूर्वप्राथमिकच्या चिमुकल्यांनी ‘मोबाईल व आई’ या विषयावर सादर केलेल्या नाटिकेने पालकांना अंतर्मुख केले. तर प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी शिवराज्याभिषेक, लावणी, गोंधळ आणि विविध प्रांतीय लोककला सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. उत्कृष्ट कार्याबद्दल विद्या बोलके, शालिनी जोशी आणि किशोरी दाभोळकर या शिक्षिकांचा विशेष सन्मान करण्यात आला. किशोरी दाभोळकर व शालिनी जोशी यांनी सूत्रसंचालन केले. वैशाली भागवत यांनी आभार मानले. सामूहिक ''वंदे मातरम्'' गायनाने कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
अध्यक्षीय भाषणात हेमंत दिवेकर सरांनी शिक्षण आणि संस्कारांच्या सांगडीवर भर दिला, तर अ‍ॅड. केदार जोशी यांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. संस्थेच्या अध्यक्षा नमिता सोमन यांनीही कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reliance Industries: रिलायन्सचा अमेरिकेत तेलशुद्धीकरण प्रकल्प; डाेनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, ३०० अब्ज डॉलरचा करार

IKEA Pune: पुणेकरांसाठी खुशखबर! सर्वांच्या आवडीचं IKEA आता पुण्यात; 'इथे' उघडलं पहिलं स्टोअर

काही महिने सोबत राहिले पण... हंसिका मोटवानीचा घटस्फोट कशामुळे झाला? खरं कारण समोर

Horoscope 13 March : 'या' 5 राशींचे उद्या नशिब पलटणार; धनलाभासह मिळेल मोठी खुशखबर, ग्रहांच्या युतीमुळे होणार प्रचंड प्रगती

ओबीसी आरक्षणासाठी नवा नियम! नॉन-क्रीमी लेयरबाबत सर्वोच्च न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय; उत्पन्न निकषांमध्ये महत्त्वाचा बदल

SCROLL FOR NEXT