मुंबई

नागरी समस्यांवरून गंजाडमध्ये आक्रोश

CD

नागरी समस्यांवरून जनआक्रोश
गंजाड ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा
कासा, ता.१०(बातमीदार)ः डहाणू तालुक्यातील गंजाड ग्रामपंचायत हद्दीत अनेक वर्षांपासून प्रलंबित नागरी समस्या, विकासकामांतील दिरंगाईमुळे विविध अडचणी उद्भवत आहे. याविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने शुक्रवारी (ता.९)जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.
डहाणू विधानसभा मतदारसंघाचे आमदार कॉ. विनोद निकोले यांच्या नेतृत्त्वात निघालेल्या मोर्चात श्रमजीवी, कष्टकरी संघटना यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गंजाड परिसरातील सरकारी जमिनींवरील अतिक्रमणे, मूलभूत सुविधांचा अभाव, पिण्याच्या पाण्याची टंचाई, खराब रस्ते, रोजगाराच्या संधींचा अभाव, आरोग्य सेवा व घरकुल योजनांतील अडथळे या ज्वलंत प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. मोर्चादरम्यान ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी अतिक्रमण केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले. तसेच संबंधित प्रकरणांची तात्काळ मोजणी करून योग्य निर्णय घ्यावा, वाढती अतिक्रमणे रोखावीत, अशी मागणी आंदोलकांनी केली.
----------------------------------------------
चोख बंदोबस्त
पाणीटंचाई, रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे दैनंदिन जीवनावर होत असल्याने आंदोलनात महिलांचा सहभाग विशेष होता. यावेळी मोर्चा शांततेत पार पडावा, यासाठी पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

Phaltan News: पाइपमध्‍ये अडकून तिघांचा मृत्‍यू; फलटण तालुक्यातील पाेटपाटातील घटना, तिघेही ओरिसातील पाेल्‍ट्री कामगार, काय घडलं!

Dharashiv News: उमरग्यात गॅससाठी लांब रांगा; बुकिंग केल्यानंतरही १५ दिवस प्रतीक्षा;सिलिंडर उशिरा मिळत असल्याने ग्राहक त्रस्त

Parbhani Gas Booking Trouble: गॅस सिलिंडर बुकिंग सर्व्हर डाउन, ऑनलाइन नोंदणी ठप्प, परभणी गॅस एजन्सी गर्दी

बोर्डाचे शिक्षकांना आदेश! दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी शाळेतच बंधनकारक; २१ दिवसांसाठी २१ दिवसांची मुदत, आता उत्तरपत्रिकांचे गठ्ठे इतिहासजमा

SCROLL FOR NEXT