मुंबई

नवी मुंबईबाहेरील आमदारांमुळे प्रचाराला रंगत

CD

जुईनगर, ता. १३ (बातमीदार) : महापालिका निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात प्रचारात विविध पक्षांकडून वेगवेगळे फंडे वापरण्यात येत आहेत. नवी मुंबईत बाजार समितीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील विशेषतः पुणे आणि सातारा जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात शहरात वास्तव्यास आहेत. या मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवी मुंबईमध्ये प्रचारासाठी आलेल्या मंत्री आणि आमदारांची स्थानिक मतदारांवर छाप पडेल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

पुणे आणि सातारा येथे मूळ असलेल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पाटणचे आमदार शंभुराज देसाई, जुन्नरचे आमदार शरद सोनावणे नवी मुंबईमध्ये प्रचाराच्या आखाड्यात उतरले आहेत. तसेच शिवसेना ठाकरे गटातील उमेदवारांच्या प्रचारासाठी मुंबईचे नेते सचिन अहिर व कोकणातील आमदार भास्कर जाधवदेखील येऊन गेले आहेत. त्यामुळे या विविध पक्षांच्या नेत्यांचा प्रभाव नवी मुंबईत चालणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
नवी मुंबई ही नियोजनबद्ध शहररचना, औद्योगिक व आयटी क्षेत्र, मध्यमवर्गीय व उच्चशिक्षित मतदारसंघ अशी ओळख असलेली महापालिका आहे. येथे पाणीपुरवठा, वाहतूक, कचरा व्यवस्थापन, पर्यावरण, नागरी सुविधा, शिक्षण आणि आरोग्य या प्रश्नांना मतदार विशेष महत्त्व देतात. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी आणि आपल्या ग्रामीण भागातील माणसाबाबत ओढ या गोष्टींसाठी आमदारांची उपस्थिती उपयुक्त ठरत असल्याचे दिसत आहे. अशा पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील आमदारांनी केलेला प्रचार स्थानिक प्रश्नांना किती स्पर्श करतो, हा कळीचा मुद्दा ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Visa: भारतीय पासपोर्टची ताकद वाढली! ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी; आंतरराष्ट्रीय प्रवास सोपा होणार

IND vs NZ, 2nd ODI: 'संकटमोचक' केएल राहुलचं खणखणीत शतक, कर्णधार गिलचीही फिफ्टी; भारताने न्यूझीलंडसमोर उभे केले मोठं लक्ष्य

Iran Indian Embassy Advisory for Tourist : इराणमधून तत्काळ बाहेर पडा! भारतीय पर्यटकांना दूतावासाकडून तातडीच्या सूचना

Latest Marathi News Live Update : राज ठाकरेंनी पराभवाची कारणं शोधून हे धंदे बंद करावे - आशिष शेलार

New IPO : सचिन तेंडुलकर ब्रँड ॲम्बेसेडर असलेल्या कंपनीचा 500 कोटींचा IPO लवकरच! जाणून घ्या डिटेल्स...

SCROLL FOR NEXT