मुंबई

सत्तेचा तीळ-गूळ कोणाच्या वाट्याला?

CD

सत्तेचा तीळ-गूळ कोणाच्या वाट्याला
मकरसंक्रांतीच्या गोडव्यासोबतच राजकीय संघर्ष शिगेला
नवनीत बऱ्हाटे : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. १४ : कोणाची संक्रांत गोड होणार आणि कोणाच्या पदरी पराभवाची कडू चव येणार? या एकाच प्रश्नाने सध्या उल्हासनगरच्या राजकीय गल्लीबोळातील वातावरण तापले आहे. मकरसंक्रांतीच्या सणाचे औचित्य साधत शहरातील सत्तासंघर्षाचा फैसला आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असून, मतदारांच्या एका ''बटना''वर दिग्गज उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.

प्रचाराची रणधुमाळी थांबली असली, तरी शांततेआड सत्तेची स्वप्ने आणि अपेक्षांचा जबरदस्त संघर्ष दडलेला आहे. शहरातील २३ प्रभागांतील चुरशीच्या लढती पाहता, अनेक ठिकाणी बहुकोनी लढतींमुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. परिणामी, कोणता पॅनल बहुमताचा आकडा गाठणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळच्या निवडणुकीत मतदारांनी केवळ आश्वासनांना न भुलता ''काम'' पाहून मतदान करण्याच्या मनःस्थितीत असल्याचे चित्र आहे. वर्षानुवर्षे रखडलेले प्रकल्प,: पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था आणि स्वच्छतेचा अभाव, झोपडपट्टी पुनर्विकास, आरोग्य व्यवस्था आणि व्यापारी वर्गाच्या समस्या आदी मुद्दे मतदारांच्या केंद्रस्थानी आहेत.

राजकीय गणित जुळणार?
यंदा मोठ्या संख्येने अपक्ष आणि विविध पक्षांचे उमेदवार रिंगणात असल्याने विजयाचे समीकरण गुंतागुंतीचे झाले आहे. भावनिक आवाहने आणि आरोप-प्रत्यारोपांच्या मालिकेनंतर आता चेंडू मतदारांच्या कोर्टात आहे. १६ जानेवारी रोजी जेव्हा मतपेट्या उघडतील, तेव्हाच खऱ्या अर्थाने कोणाची मकरसंक्रांत गोड झाली, हे स्पष्ट होईल. उल्हासनगरच्या इतिहासात ही निवडणूक निर्णायक वळण देणारी ठरेल. काम करणाऱ्या उमेदवाराला मतदार पसंती देतात की पुन्हा एकदा जुन्याच समीकरणांना थारा मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Visa Suspend: अमेरिकेचा मोठा निर्णय! रशिया, इराणसह ७५ देशांसाठी व्हिसा प्रक्रिया थांबवली; भारत आणि पाकिस्तानचं काय? जाणून घ्या...

IND vs NZ, 2nd ODI: भारतावर पराभवाची संक्रांत! डॅरिल मिशेलचं शतक, विल यंगनेही दिली भक्कम साथ; न्यूझीलंडचा दणदणीत विजय

सोलापूर महापालिका निवडणूक! ३५०० पोलिसांचा ४८ तास खडा पहारा; क्युआरटी, आरसीपी, एसआरपीएफच्याही तुकड्या; शहरात ४६ ठिकाणी फिक्स पॉइंट

Latest Marathi News Live Update : निवडणुकीत कुणालाही पाठिंबा नाही - मनोज जरांगे

SSC and HSC Exam Centers: मोठी बातमी! दहावी-बारावीच्या 107 परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द; पाहा संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT