भाऊ कदम यांना घोलवडमध्ये पाहुणचार
बोर्डी, ता.१३ (बातमीदार) ः मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पालघर जिल्ह्यात सुरू आहे. याच अनुषंगाने डहाणू तालुक्यातील घोलवड ग्रामस्थांच्या पाहुणचाराने सिने अभिनेते भाऊ कदम भारावून गेले.
घोलवड गावातील टोकेपाडा येथील अमृत सरोवर योजनेतील तलाव आणि महिलांच्या बांबु हस्तकला वस्तूंची पाहणी मंगळवारी श्रता.१३) भेट दिली. यावेळी कोलपाडा येथील कृषी पर्यटन केंद्राला त्यांनी भेट दिली. घोलवड सरपंच रवींद्र बुजड, उपसरपंच कुणाल शहा, ग्रामपंचायत अधिकारी गुरुनाथ वारघडे यांनी स्वागत केले. मधुमक्षिका पालन, मध उत्पादक शेतकऱ्यांशी भाऊंनी संवाद साधून उत्पादित मधाची चव चाखली. तर वारली चित्र चितारणाऱ्या राकेश दळवी कलेचे विविध पैलू समजून घेतले. यावेळी प्राथमिक मराठी शाळेच्या मैदानावर आदिवासींच्या तारपा नृत्यात सहभाग घेतला. तसेच सुंदर, स्वच्छ व निसर्गसंपन्न गावाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळेल, असा आशावाद व्यक्त केला.
------------------------------------
विनोदी शैलीतून संवाद
या अभियानात घोलवड गाव पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावण्याच्या दर्जाचे असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच विनोदी शैलीतून हशा पिकवत शासनाचे सर्व उपक्रम राबवण्याचे उपस्थितांना आवाहन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.