आता ''कसोटी'' मतदारांची
उल्हासनगर, ता. १४ (वार्ताहर): आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, गाजलेल्या जाहीर सभा, शक्तिप्रदर्शनाने गाजवलेल्या रॅल्या आणि समाज माध्यमांवरील प्रचाराचा धुरळा... या सर्व गदारोळानंतर अखेर मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता उल्हासनगरमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या. आता राजकीय कोलाहल थांबला असून संपूर्ण शहराची नजर १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानावर खिळली आहे.
गेल्या पंधरवड्यापासून शहरात राजकीय तापमान कमालीचे वाढले होते. विकासाचे दावे, अपूर्ण प्रकल्पांवरून झालेले आरोप, रस्ते, पाणी आणि स्वच्छतेचा प्रश्न यावरून उमेदवारांनी एकमेकांना धारेवर धरले. प्रचाराच्या शेवटच्या तासांत उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांना भावनिक साद घालत विजयासाठी शेवटचा जोर लावला. प्रचाराची अधिकृत वेळ संपल्याने झेंडे उतरले असून माईकही शांत झाले आहेत; मात्र, आता सुरू झाला आहे तो ''छुप्या'' प्रचाराचा आणि गाठीभेटींचा काळ. मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी गुप्त रणनीती आखली आहे.
प्रशासकीय तयारी आणि बंदोबस्त
निवडणूक प्रशासनाने मतदान प्रक्रियेसाठी कडेकोट तयारी केली आहे. मतदानासाठी ईव्हीएम मशीन सज्ज असून कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलिस फौजफाटा तैनात आहे. मतदानासाठी पवई चौक व आसपासच्या परिसरात वाहतुकीचे नियम कडक करण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.