११ केंद्रांवर होणार मतमोजणी
ठाणे, ता. १४ : ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान पार पडणार असून, अवघ्या २४ तासांत म्हणजेच १६ जानेवारीला सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. शहरात एकूण ११ ठिकाणी मतमोजणी केंद्रे उभारण्यात आली असून, प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. प्रत्येक मतमोजणी केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. केंद्रांच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच मतमोजणी प्रक्रियेसाठी ११ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
प्रभागनिहाय मतमोजणी केंद्रांचा तपशील
प्रभाग समिती प्रभाग क्रमांक मतमोजणी केंद्राचे ठिकाण
माजिवडा–मानपाडा १, २, ३, ८ न्यू होरायझन एज्युकेशन सोसायटी (इमारत सी), हिरानंदानी इस्टेट
वर्तकनगर ४, ५, ७ स्व. बाबूराव सरनाईक जिम्नॅशियम सेंटर, पोखरण रोड क्र. २
लोकमान्य सावरकरनगर ६, १३, १४, १५ महिला बचत गट भवन, कोरस हॉस्पिटलजवळ
वागळे इस्टेट १६, १७, १८ शासकीय तंत्रनिकेतन, वागळे इस्टेट
नौपाडा–कोपरी १९, २०, २१, २२ व्हीपीएम पॉलिटेक्निक कॉलेज, ठाणा कॉलेज परिसर
उथळसर १०, ११, १२ होली क्रॉस हायस्कूल हॉल, के. व्हीला
कळवा ९, २३, २४, २५ सह्याद्री हायस्कूल (चौथा मजला), कळवा
मुंब्रा २६, ३१ मौलाना अबुल कलाम स्टेडियम (तळमजला), कौसा
मुंब्रा ३०, ३२ मौलाना अब्दुल कलाम स्टेडियम (पहिला मजला), कौसा
दिवा २७, २८ मौलाना अबुल कलाम स्टेडियम (दक्षिण बाजूकडील ७ गाळे)
दिवा २९, ३३ मौलाना अबुल कलाम स्टेडियम (उत्तर बाजूकडील ७ गाळे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.