मुंबई

जन्मशताब्दीनिमित्त दिबांना जासईत आदरांजली

CD

जन्मशताब्दीनिमित्त दिबांना जासईत आदरांजली
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्याची पुन्हा मागणी
उरण, ता. १४ (वार्ताहर) : भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांचे नेते, ओबीसी चळवळीचे अग्रणी दिवंगत दि. बा. पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त जासई येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीला पुन्हा एकदा धार मिळाली. जासईमध्ये आयोजित या कार्यक्रमाला भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्‍हात्रे, काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार, संतोष घरत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी जासई परिसरातील ग्रामस्थ व प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमादरम्यान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव न दिल्याबद्दल प्रकल्पग्रस्तांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. आपल्या मनोगतात खासदार सुरेश म्‍हात्रे यांनी सांगितले, की निवडणुका संपल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार हे स्वतः या विषयात लक्ष घालणार असून, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे हेही या मागणीसाठी आंदोलनात उतरणार आहेत, अशी ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिली. दि. बा. पाटील हे देशाच्या राजकारणात आदराने नाव घेतले जाणारे नेतृत्व होते. ओबीसी चळवळीचे ते अग्रणी होते, मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. विशेषतः १९८४ रोजी भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांसाठी झालेल्या ऐतिहासिक लढ्याचे ते नेतृत्व होते. त्या आंदोलनात पाच हुतात्म्यांनी बलिदान दिले, तरीही आजतागायत विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव न देणे ही मोठी शोकांतिका असल्याची भावना या वेळी व्यक्त करण्यात आली. कामगार नेते व काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी आपल्या भाषणात सांगितले, की दि. बा. पाटील यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून सरकारने तातडीने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचे नाव द्यावे. तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित ग्रामस्थांनी एकमुखाने दि. बा. पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Visa Suspend: अमेरिकेचा मोठा निर्णय! रशिया, इराणसह ७५ देशांसाठी व्हिसा प्रक्रिया थांबवली; भारत आणि पाकिस्तानचं काय? जाणून घ्या...

IND vs NZ, 2nd ODI: भारतावर पराभवाची संक्रांत! डॅरिल मिशेलचं शतक, विल यंगनेही दिली भक्कम साथ; न्यूझीलंडचा दणदणीत विजय

सोलापूर महापालिका निवडणूक! ३५०० पोलिसांचा ४८ तास खडा पहारा; क्युआरटी, आरसीपी, एसआरपीएफच्याही तुकड्या; शहरात ४६ ठिकाणी फिक्स पॉइंट

Latest Marathi News Live Update : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर

SSC and HSC Exam Centers: मोठी बातमी! दहावी-बारावीच्या 107 परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द; पाहा संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT