आदर्श महिला महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिवस
श्रीवर्धन, ता. १५ (बातमीदार) : श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई संचालित महर्षी कर्वे आदर्श महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना समितीच्या वतीने १३ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवादिन व माँसाहेब जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
विद्यार्थिनी प्रियल प्रकाश शिगवण हिने ‘स्वामी विवेकानंद यांना अपेक्षित युवा’ या विषयावर, ऋतुजा पड्याळ हिने ‘माँसाहेब जिजाऊ यांचे जीवनचरित्र’ तर प्रेरणा प्रल्हाद सातम हिने ‘माँसाहेबांच्या प्रेरणेतून आजची स्त्री’ या विषयावर भाषण केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून समन्वयक डॉ. योगेश यशवंत लोखंडे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन वैष्णवी अशोक म्हात्रे हिने, तर आभार प्रदर्शन रिया रवींद्र गोविलकर हिने केले.
याप्रसंगी रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. सुमीत चव्हाण, प्रा. ऋषिकेश चोगले, प्रा. निखत राजपूरकर, करिष्मा शहा, प्रिया पवार, मनीषा श्रीवर्धनकर, अभिजित पुसाळकर तसेच महाविद्यालयातील विद्यार्थीनी उपस्थित होत्या.
(फोटो - विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. योगेश लोखंडे.)