इंटरनॅशनल शाळा, पण दारात कचरा!
मतदानानंतर अभिनेता शशांक केतकरचा अस्वच्छतेवर संताप
ठाणे, ता. १५ : लोकप्रिय मराठी अभिनेता शशांक केतकर याने ठाण्यात आपला मतदानाचा हक्क बजावला; मात्र ज्या शाळेत मतदान केंद्र होते, त्याच शाळेच्या प्रवेशद्वारावरील अस्वच्छता आणि कचऱ्याचे ढीग पाहून शशांकने समाजमाध्यमांवर आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे. ठाण्यातील तथाकथित विकासाच्या दाव्यांवर त्याने या निमित्ताने मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
शशांकने मतदानानंतर बोटावरची शाई दाखवत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्या शाळेत तो मतदानासाठी गेला होता, ती एक नामांकित ‘इंटरनॅशनल स्कूल’ आहे. मात्र, या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेच्या अगदी बाहेरच कचऱ्याचे साम्राज्य आणि दुर्गंधी पसरलेली पाहायला मिळाली. हा विदारक विरोधाभास दाखवत शशांकने प्रशासकीय बेफिकिरीवर ताशेरे ओढले.
‘‘उद्या कोणत्याही पक्षाचा उमेदवार निवडून आला, तरी ‘स्वच्छता’ या साध्या विषयासाठी कोणीही पुढाकार घेणार नाही,’’ असे शशांकने आपल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. केवळ प्रशासनच नाही, तर नागरिकही याकडे लक्ष देणार नाहीत, याची मला खात्री आहे, अशी खंत त्याने व्यक्त केली. ‘‘घाण, प्रदूषण आणि फसवणूक... हे आता चालणार नाही,’’ असा स्पष्ट इशारा त्याने दिला आहे.
ठाण्यातील विकासावर प्रश्नचिन्ह
एकीकडे स्मार्ट सिटी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या गप्पा मारल्या जात असताना, एका नामांकित शाळेच्या दारातच कचऱ्याचे ढीग साचलेले असणे, ही शरमेची बाब असल्याचे शशांकने अधोरेखित केले. त्याची ही पोस्ट सध्या समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होत असून, ठाणेकर नागरिकही त्यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.