मुंबई

पनवेलचा गड भाजने राखला

CD

पनवेलचा गड भाजपने राखला
मविआच्या १८ जागा, शेकापचा मोठा पराभव

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १६ : महायुतीच्या प्रतिष्ठेविरोधात महाविकास आघाडीच्या अस्तित्वाच्या लढाईत अखेर शिवसेना- भाजप- अजित पवार गट महायुती वरचढ ठरली. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने ६० जागांवर दणदणीत विजय प्राप्त करीत पनवेल महापालिकेवर निर्विवाद सत्ता कायम ठेवली. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे मोठे पानिपत झाले. तर शेकापला नऊ, शिवसेना ठाकरे गट पाच आणि काँग्रेस चार असे महाविकास आघाडीच्या वाट्याला अवघ्या १८ जागा जिंकता आल्या.
पनवेल महापालिकेच्या ७८ जागांसाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) महायुतीने ७८ जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यापैकी सुरुवातीच्या काळात भाजपने सहा जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आणत विजयी सलामी दिली. यात अपक्ष उमेदवार स्नेहल ढमाले यांचाही विजय झाल्याने भाजपच्या बिनविरोध नगरसेवकांमध्ये सातव्या नगरसेवकाची भर पडली. पैशांचा आणि धमकीचा दबाव टाकून बिनविरोध उमेदवार आणल्याचा आरोप शेकाप आणि महाविकास आघाडीने महायुतीवर केला; मात्र तरीदेखील त्याचा मतांवर परिणाम न झाल्याने भाजप महायुतीने प्रत्यक्ष निवडणुकीत ५३ नगरसेवक निवडून आणले. आधीचे सात आणि मतदानानंतर ५३ उमेदवारांमुळे भाजपने सत्ता स्थापनेसाठी हवा असलेला आकडा पूर्ण करून तब्बल ६० जागांवर विजय संपादित केला. पनवेल महापालिका निवडणूक प्रभारी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली लढविण्यात आली. आमदार महेश बालदी आणि प्रशांत ठाकूर यांनी निवडणूक प्रमुख म्हणून काम पाहिले. भाजपच्या संघटित कामाउलट शेकाप, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचा प्रचार राहिला. भाजपविरोधात दिलेल्या चुकीच्या उमेदवारीचा फटका आधीच महाविकास आघाडीला बसला. या चुकीतून शहाणपण न घेतल्याने प्रचारात एका मुद्द्यांवर स्थिर राहता न आल्याने अखेर महाविकास आघाडीला मतदारांनी कौल दिला नाही. सत्ताधाऱ्यांनी गेल्या सहा वर्षांत केलेल्या चुका जनतेसमोर प्रकर्षाने दाखवण्यास विरोधक कमी पडल्याचा हा फटका बसल्याची चर्चा होत आहे. कामोठे येथे भाजपनेही चुकीचे उमेदवार दिल्यामुळे नागरिकांनी त्यांना नाकारत महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या बाजूने निकाल दिला. हा भाजपला फटका बसला; पण एकूणच पनवेल महापालिकेच्या सलग दुसऱ्यांदा शिवसेना- भाजप महायुतीची सत्ता कायम ठेवण्यात प्रशांत ठाकूर यांना यश आले आहे.
-------------------------------------------

हा विजय म्हणजे विकास आणि सक्षम नेतृत्वावर पनवेलकरांनी दाखवलेला विश्वास आहे. नागरिकांना अपेक्षित विकास करण्याचा आम्ही संकल्प कायम केला आहे. त्यामुळे यापुढे विकासाचा झंझावात कायम ठेवू.
- प्रशांत ठाकूर, आमदार

-----------------------------------------

पनवेलमध्ये एकूण जागा - ७८
भाजप- शिवसेना- अजित पवार महायुती - ६०

शिवसेना ठाकरे गट - ५
खारघरमधून प्रभाग क्रमांक ५ ब मधून लीना गरड, ५ ड मधून उत्तम मोरबेकर, कामोठे प्रभाग क्रमांक ११ अ मेघना घाडगे, १२ रितीक्षा गोवारी आणि प्रिया गोवारी यांनी कामोठ्यातून पॅनेल भाजपचे दोन उमेदवार पाडले.


शेकाप - ९
प्रभाग क्रमांक १४ खांदा कॉलनी आणि नवीन पनवेल हा पूर्ण पॅनेल आणला. लतीफ शेख, आर्या जाधव, मनीषा म्हात्रे, राम भगत, प्रभाग क्रमांक २ अर्जना भोईर, योगिता फडके, नावडेतून अरविंद म्हात्रे, राम पाटील, प्रभाग क्रमांक १ ड मधून जनार्दन पाटील.

काँग्रेस - ४
धानसरमधून तुषार पाटील, प्रगती पाटील, लीना कातकरी, हरेश केणी


अपक्ष - १
स्नेहल ढमाले पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : मुंबईत भाजपचा ८९ जागांवर विजय, महापौर महायुतीचाच

BMC Election 2026 Result : मुंबई महापालिका निवडणूक निकालाबाबत ‘साम मराठी’चा 'एग्झिट पोल' ठरला तंतोतंत खरा!

निवडणूक नियोजन, तिकीट वाटप ते रणनीतीपर्यंत... महापालिका निकालांत ‘देवेंद्र–रविंद्र’ जोडीचा करिष्मा! केमिस्ट्री ठरली गेमचेंजर

BMC Mayor: मुंबईचा नवा महापौर कोण होणार? भाजपच्या 'या' पाच उमेदवारांच्या जोरदार चर्चा; कुणाला मिळणार संधी?

Devendra Fadnavis: मुंबईचा महापौर कोण होणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी पत्रकार परिषदेत दिले संकेत; म्हणाले...

SCROLL FOR NEXT