मुंबई

मुंबईत महापौर-उपमहापौरांनी गड राखला

CD

महापौर-उपमहापौरांनी मुंबईत गड राखले
मोठे मताधिक्य घेत विजयी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मुंबई महापालिकेत महापौर-उपमहापौर म्हणून काम केलेल्या सात जणांनी आज आपले गड राखले. त्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव, विशाखा राऊत, मिलिंद वैद्य आणि उपमहापौर हेमांगी वरळीकर, ॲड. सुहास वाडकर, भाजपच्या अलका केरकर यांचा समावेश आहे. पालिकेच्या मानाच्या पदावर काम केलेल्या हे मान्यवरांच्या लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले होते; मात्र त्यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवत आपला अनुभव सार्थ ठरवला. मुंबई महापालिकेत २२७ प्रभाग असून त्यासाठीच्या निवडणूक रिंगणात तब्बल १,७०० उमेदवार होते. शिवसेना (ठाकरे)- मनसे युती, भाजप- शिवसेना, काँग्रेस- वंचित बहुजन आघाडी आणि इतर लहान पक्ष, अपक्ष निवडणूक लढवत असल्याने निकाल काय लागणार, प्रस्थापितांना धक्का बसणार का, याकडे लक्ष लागले होते.
...
मिलिंद वैद्य
शिवसेनेचे माजी विभागप्रमुख असलेले मिलिंद वैद्य प्रभाग क्रमांक १८२मधून शिवसेना (ठाकरे) यांच्या तिकिटावर मैदानात उतरले होते. त्यांनी तब्बल १४ हजार २८४ मते घेत भाजपच्या राजन पारकर यांचा पराभव केला आहे. पारकर यांना ४,३९४ मते मिळाली आहेत. ही निवडणूक माजी आमदार सदा सरवणकर आणि भाजपने प्रतिष्ठेची केली होती.
...
विशाखा राऊत
प्रभाग क्रमांक १९१मधून शिवसेना ठाकरे गटाकडून माजी महापौर विशाखा राऊत या निवडणूक रिंगणात होत्या. त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या प्रिया सरवणकर-गुरव यांचा पराभव करीत पुन्हा पालिकेत एंट्री केली आहे.
...
किशोरी पेडणेकर
प्रभाग क्रमांक १९९मधून शिवसेना ठाकरे गटाकडून मैदानात असलेल्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी तब्बल १२ हजार ७८६ मते मिळवत शिवसेना शिंदे गटाच्या रूपाली कुसळे यांना पराभवाची धूळ चारली आहे. कुसळे यांना ११ हजार ९७ एवढी मते मिळाली आहेत.
...
श्रद्धा जाधव
माजी महापौर राहिलेल्या श्रद्धा जाधव या प्रभाग क्रमांक २०२मधून शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार होत्या. त्यांनी तब्बल ११ हजार ११२ मते घेत भाजपच्या पार्थ बावकर यांचा पराभव केला आहे. बावकर यांना सात हजार ९८२ मते मिळाली आहेत.
...
हेमांगी वरळीकर
प्रभाग क्रमांक १९३मधून शिवसेना ठाकरे गटाच्या तिकिटावर माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर यांनी निवडणूक लढवली होती. त्यांना १२ हजार ६७८ मते मिळाली असून त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या प्रल्हाद वरळीकर यांचा पराभव केला आहे. प्रल्हाद वरळीकर यांना नऊ हजार ८३७ मते घेतली.
...
ॲड. सुहास वाडकर
प्रभाग क्रमांक ४१मधून माजी उपमहापौर ॲड. सुहास वाडकर हे शिवसेना ठाकरे गटाच्या तिकिटावर निवडणूक लढवत होते. त्यांनी सात हजार १९६ मते घेत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार मानसी पाटील यांचा ५९६ मतांनी पराभव केला.
...
अलका केरकर
माजी उपमहापौर असलेल्या अलका केरकर या भाजपच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक ९८मधून निवडणूक लढत होत्या. त्यांना नऊ हजार ८१९ मते मिळाली असून मनसेच्या दीप्ती काते यांचा पराभव केला आहे. काते यांना केवळ दोन हजार ५३३ मते मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : महाराष्ट्राच्या राजकारणात एमआयएमची जोरदार मुसंडी विजया जागांचं ठोकलं शतक

Eknath Shinde Statement: मुंबईच्या महापौर पदाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले..

BMC Election 2026 Result : मुंबई महापालिका निवडणूक निकालाबाबत ‘साम मराठी’चा 'एग्झिट पोल' ठरला तंतोतंत खरा!

End of the World : जगातलं शेवटचं शहर माहितीये का? जिथे पृथ्वीच संपते..लाखो लोकांना नाही माहिती

निवडणूक नियोजन, तिकीट वाटप ते रणनीतीपर्यंत... महापालिका निकालांत ‘देवेंद्र–रविंद्र’ जोडीचा करिष्मा! केमिस्ट्री ठरली गेमचेंजर

SCROLL FOR NEXT