ज्येष्ठ माजी नगरसेवकांनी प्रभाग राखले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, १६ : मुंबई महापालिकेतील काही ज्येष्ठ माजी नगरसेवक या वेळी निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यातील बहुतांश ज्येष्ठ माजी नगरसेवकांनी आपापले प्रभाग राखल्याचे दिसून आले. भाजप आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) यांची माजी ज्येष्ठ नगरसेवकांवर मदार होती. त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त माजी नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते.
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे माजी महापौर मिलिंद वैद्य हे १८२ प्रभागातून १२ हजार ४४८ मते घेऊन विजयी झाले. त्यांनी भाजपचे राजन पारकर यांचा पराभव केला. माजी महापौर श्रद्धा जाधव या शिवसेना ठाकरे पक्षातून प्रभाग २०२मध्ये विजयी झाल्या आहेत. त्यांनी ११ हजार ११२ मते घेत भाजपचे पार्थ बावकर यांचा पराभव केला. भाजपचे प्रभाकर शिंदे यांचा प्रभाग १०६ मधून ११ हजार ८९७ मते मिळवून विजय झाला. त्यांचे प्रतिस्पर्धी मनसेचे सत्यवान दळवी यांना ११ हजार ७३३ मतांवर समाधान मानावे लागले. भाजपचे शिंदे यांचा १६४ मतांनी निसटता पराभव झाला.
निवडणुकीच्या काळात भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राखी जाधव या प्रभाग १३१मध्ये १२ हजार ९७४ मते मिळवून विजय झाल्या. त्यांनी शिवसेना ठाकरे पक्षाच्या वृषाली जाधव यांचा पराभव केला. वृषाली यांना ७,८४१ मतांवर समाधान मानावे लागले. प्रभाग १८५मध्ये पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि भाजपचे रवि राजा यांचा पराभव झाला. शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार टी. एम. जगदीश यांनी त्यांचा पराभव केला. आरक्षणामुळे प्रभाग बदलल्याने काही माजी नगरसेवकांचे वॉर्ड बदलले होते. त्यामुळे नव्या जागेवर लढणे अवघड झाल्याने काहींचा पराभव झाला. त्यांना प्रभाग राखता आले नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.