मुंबई

पेण खारेपाट भागात भीषण पाणीटंचाई

CD

पेण खारेपाट भागात भीषण पाणीटंचाई
माजी जि.प. सभापती संजय जांभळे प्रशासनाविरोधात आक्रमक
पेण, ता. १७ (वार्ताहर) ः पेण तालुक्यातील खारेपाट भागातील वाशी-वडखळ विभागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून येत्या आठवडाभरात केवळ एक ते दोन दिवसच पाणीपुरवठा होणार असल्याचे पत्र जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने संबंधित सरपंच व प्रशासकांना पाठवले आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषेद घेत माजी जिल्हा परिषद सभापती संजय जांभळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनावर आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे.
यावेळी जांभळे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून पेण खारेपाट भागातील जनता पाणीटंचाईला सामोरी जात आहे. या प्रश्नासाठी वेळोवेळी मोर्चे, आंदोलने करण्यात आली. त्या काळात या भागासाठी निधीही मंजूर झाला; मात्र आजतागायत प्रत्यक्षात एक थेंबही पाणी नागरिकांच्या नळांपर्यंत पोहोचलेले नाही. केंद्र शासनाची ‘जल जीवन मिशन’ योजना देखील येथे पूर्णतः कुचकामी ठरली आहे. केवळ टाक्या बांधून योजना पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले, पण त्या टाक्यांमध्ये पाणीच नसल्याची गंभीर स्थिती आहे. या सर्व कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत जांभळे यांनी सांगितले की, सुमारे ३८ कोटी रुपयांच्या योजनेचा अक्षरशः बोजवारा उडवण्यात आला आहे. सध्या निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांनी कधीही या भागातील पाणीटंचाईकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्याचा फटका थेट सामान्य नागरिकांना बसत आहे. याशिवाय आठवड्यातून अनेकदा पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचे त्यांनी नमूद केले. हेटवणे धरणातील भूमिगत कालव्याच्या कामांमुळे उन्हाळी शेतीवरही परिणाम झाला असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे जांभळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
......................
निवडणुकीचे संकेत
या सर्व समस्यांच्या विरोधात जनतेच्या माध्यमातून संघर्ष उभारणार असल्याचे जाहीर करत संजय जांभळे यांनी सांगितले की, यापूर्वी मी आणि माझ्या दिवंगत पत्नीने वडखळ-वाशी मतदारसंघातून जिल्हा परिषद निवडणूक जिंकली आहे. आजही जनतेचे भक्कम पाठबळ आमच्या पाठीशी असल्याने येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत वडखळ गटातून महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT