मुंबई

खालापूरात रासायनिक कारखान्याला आग. आसपास लोकवस्ती मुळे प्रशासन सावध

CD

खालापूरमध्ये रासायनिक कारखान्याला आग
खालापूर, ता. १७ (बातमीदार) ः तालुक्यातील खोपोली-पेण मार्गावर असलेल्या नारंगी गावानजीक एचपी ॲडेटिव्ह या रासायनिक कारखान्यात शनिवारी (ता. १७) रात्री आग लागली. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. कारखान्यालगतच आदिवासी वाडी, लोकवस्ती असल्याने प्रशासन या ठिकाणी विशेष लक्ष ठेवून आहे.
तालुक्यातील छत्तीशी विभाग म्हणून डोणवत, नारंगी भाग ओळखला जातो. या ठिकाणी लहान-मोठे कारखाने आहेत. एचपी केमिकल ॲडेटिव्ह कारखान्यात जवळपास साडेचारशे कामगार काम करतात. आग लागण्याच्या घटनेच्या वेळेस शिफ्ट संपल्यामुळे केवळ चार ते पाच कामगार होते. रसायनाचे ड्रम ठेवलेल्या भागात एअर कंडिशनचा स्फोट झाल्यामुळे उडालेल्या ठिणग्यांतून आग पसरली. अतिज्वालाग्राही रसायनामुळे झपाट्याने आग वाढली. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न होत होते. आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती खालापूर पोलिस निरीक्षक सचिन पवार यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel War मुळे भारतात दारूचा दुष्काळ? उन्हाळ्यात थंड बिअरही मिळणार नाही? उत्पादनावर काय परिणाम होणार

IPL 2026: 'रोहित शर्मा डगआऊटमधून २० ओव्हर पाहू शकत नाही, त्याला...', माजी क्रिकेटरचा मुंबई इंडियन्सला स्पष्ट सल्ला

Gudhipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

Latest Marathi News Live Update : पुण्यात पिरंगुट घाटात कार दरीत कोसळली

Kolhapur Headmaster Tragedy : निलंबनाचे नैराश्य मुख्याध्यापकाने थेट आंब्याच्या झाडाला घेतला गळफास, कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT